Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या, फिचर » इसिसमुळे जगातील सर्वात मोठ्या दफनभूमीची निर्मिती

इसिसमुळे जगातील सर्वात मोठ्या दफनभूमीची निर्मिती

=रोज पुरले जाताहेत  २०० मृतदेह=
वृत्तसंस्था
नजफ, २६ नोव्हेंबर –
wadi-al-salam-iraqदहशतवाद्यांचा विशेषत: इसिसचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या इराकमध्ये जगातील सर्वात मोठी दफनभूमी निर्माण झाली आहे. इराकमधील सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे मृतांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. इराकी लढवय्यांचे दफन येथे करण्यात येते.
इराकमधील नजफ शहरातील ‘वादी-अल-सलाम’ ही दफनभूमी ‘पीस व्हॅली’ या नावाने ओळखली जाते. येथे दररोज सुमारे २०० मृतदेहांचा दफनविधी केला जातो. जेव्हा इसिसच्या दहशतवादी कारवाया होत नव्हत्या तेव्हाही येथे दररोज सुमारे १०० मृतदेह पुरण्यात यायचे. मात्र, आता दहशतवादी हल्ल्यांमुळे हा आकडा वाढून २०० वर गेला आहे. इसिसच्या दहशतवाद्यांशी लढायला जाण्यापूर्वी इराकचे अनेक सैनिक येथे प्रार्थना करतात. संघर्षात मृत्यू आल्यास ‘वादी-अल-सलाम’मध्ये आपल्याला दफन करण्यात यावे, अशी इच्छा हे सैनिक व्यक्त करतात.  १ हजार ४८५ एकरचा विस्तार असलेल्या या दफनभूमीत शिया धर्माचे इमाम अली तालिब यांच्या मृतदेहाचे दफन करण्यात आले होते. त्यांचे लाखो अनुयायी येथील प्रार्थनास्थळावर आपला माथा टेकवितात.
पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र
एखादी दफनभूमी ही आकर्षणाचे केंद्र असू शकते काय? यावर एरवी विश्‍वास बसणार नाही. मात्र, ही दफनभूमी पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र झालेली आहे, हे विशेष. जगातील सर्वात मोठी दफनभूमी असलेल्या ‘वादी-अल-सलम’ला भेट द्यायला दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या, फिचर. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google