Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » इस्रालयचे पंतप्रधान भारत भेटीवर

इस्रालयचे पंतप्रधान भारत भेटीवर

=दहशतवादविरोधी लढ्यात संपूर्ण पाठिंबा=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर –
president-reuven-rivlin-reuven-rivlin-israeli-pmभारत आणि इस्रायलमधील मैत्री क्षणिक नाही आणि आमच्या संबंधात लपवून ठेवण्यासारखे काहीच नाही. दहशतवाद हीच आजच्या जगापुढील मुख्य समस्या असून, भारताने याविरोधात छेडलेल्या लढ्याला आमचा परिपूर्ण पाठिंबा आहे, असे स्पष्ट प्रतिपादन इस्रायलचे पंतप्रधान रिवेन रिवलिन यांनी सोमवारी केले.
आठ दिवसांच्या भारत भेटीवर रिवलिन यांचे आज मुंबईत आगमन झाले. गेल्या दोन दशकांत भारताला भेट देणारे ते या देशाचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. मुंबईतून आपल्या दौर्‍याला प्रारंभ करताना त्यांनी भारत आणि इस्रायलची मैत्री अतिशय मजबूत असल्याचे जाहीर केले.
वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले की, पॅलेस्टाईन मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये वैचारिक मतभेद असल्याचे आमच्या राष्ट्राध्यक्षांनीही मान्य केले आहे. पण, उभयतांच्या मैत्रीवर या मतभेदांचा कधीच परिणाम झाला नाही. दोन्ही देशांमधील राजनयिक संबंधांना पुढील वर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत आणि हे संबंध आमच्यासाठी गर्वाचाच विषय आहे.
लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्याची भारताची क्षमता अद्‌भूत अशीच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा देश दहशतवादाविरोधात प्रभावीपणे लढा देत आहे, असे सांगताना ते म्हणाले की, दहशतवादाचे समर्थन कदापि करता येणार नाही. दहशतवादी कारवाया करणारे कोण आणि त्यात बळी जाणारे कोण, हा विषयच नाही. दहशतवाद हा दहशतवादच आहे आणि त्याचा प्रभावीपणे मुकाबला करण्याची गरज आहे. भारताच्या या लढ्यात आमचा संपूर्ण पाठिंबा आहे.
भारत आणि इस्रायल मैत्री ही केवळ दोन नेते किंवा सरकारपुरती मर्यादित नाही, तर दोन्ही देशांमधील सर्वच स्तरावरील लोकांमधील विश्‍वास आणि प्रेमाचे प्रतीक आहे. सकाळी मैत्री आणि रात्र झाली की शत्रूत्व असेही आमचे संबंध नाही. आमच्या मैत्रीत लपविण्यासारखे काहीच नाही. भारत आणि इस्रायलचे भवितव्य सुरक्षित करणे हाच आमच्या मैत्रीचा एकमेव आधार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google