Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » इस्लामाबादला धडक द्या

इस्लामाबादला धडक द्या

=इम्रान खानचे कार्यकर्त्यांना निर्देश=
imran-khanलाहोर, [२९ ऑक्टोबर] – पोलिस व सुरक्षा दलांच्या हाती तुरी द्या, अटक टाळा आणि २ नोव्हेंबरपर्यंत इस्लामाबादला घेरण्यासाठी तिथे दाखल व्हा, असे निर्देश पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफचे नेते इम्रान खानने आज शनिवारी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
इम्रानने इस्लामाबादवर मोर्चा नेण्याचा इशारा दिल्यापासून आतापर्यंत त्याच्या पार्टीच्या ६०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
इम्रान आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाला की, गटागटाने प्रवास करा आणि पोलिस ज्या मार्गांवर तैनात असतील तो सोडून दुसर्‍या मार्गांनी इस्लामाबादपर्यंत पोहोचा. तत्पूर्वी, इम्रानच्या पार्टीची आज शनिवारीच इस्लामाबाद आणि अन्य शहरांमध्ये व्यापक आंदोलन करण्याची योजना होती. पण, दोन दिवसांपासून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर पंजाब पोलिसांनी पेशावर-इस्लामाबाद मोटार-वे पूर्णपणे बंद केला. इम्रानच्या कार्यकर्त्यांना इस्लामाबादेत येण्यापासून रोखण्याच्या सर्वच मार्गांचीही नाकेबंदी करण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google