Home » छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय » इस्लामिक रिसर्चच्या १० संकुलांवर धाडी

इस्लामिक रिसर्चच्या १० संकुलांवर धाडी

=झाकिर नाईकविरुद्ध गुन्हा दाखल, एनआयएची धडक कारवाई=
वृत्तसंस्था
मुंबई/नवी दिल्ली, १९ नोव्हेंबर –

Mumbai: National Investigation Agency (NIA) team and Mumbai Police raids the Islamic Research Foundation office headed by Zakir Naik at Dongri in Mumbai on Saturday. PTI Photo(PTI11_19_2016_000195A)

आपल्या प्रक्षोभक भाषणांनी मुस्लिम तरुणांना दहशतवादी बनविणारा वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या सुमारे दहा संकुलांवर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयएने शनिवारी धाडी घातल्या आणि या सर्वच कार्यालयांची कसून झाडाझडती घेतली.
झाकिर आणि त्याच्या काही अन्य साथीदारांविरोधात शुक्रवारी रात्री दहशतवाद प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर एनआयएची विविध पथके आज सकाळीच राजधानी दिल्लीहून मुंबईत दाखल झाली आणि मुंबई पोलिसांच्या मदतीने त्याच्या संस्थेच्या एकूण दहा ठिकाणांची झडती घेतली. तथापि, या धाडींमध्ये एनआयए पथकांच्या हातात नेमके काय लागले, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
धर्माच्या नावावर दोन समाजांमध्ये शत्रूत्व निर्माण करणे, प्रक्षोभक भाषणबाजी करून तरुण वर्गाला दहशतवादी मार्गावर जाण्यासाठी प्रेरित करणे यासह विविध गंभीर आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, याच आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्रालयाने झाकिरच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत बंदी घातली होती. यानंतर एनआयए व मुंबई पोलिसांनी त्याच्या संस्थेला नोटीस बजावली होती.
बांगलादेशच्या ढाका शहरातील गुलशान भागात असलेल्या कॅफेत दोन महिन्यांपूर्वी इसिसच्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला होता. यात भारतीय तरुणीसह २२ जणांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यात सहभागी असलेल्या एका अतिरेक्याने, ‘झाकिरच्या प्रक्षोभक भाषणामुळेच आपल्याला दहशतवादी कारवायांची प्रेरणा मिळाली,’ असा मजकूर सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर झाकिरच्या प्रक्षोभक भाषणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी तपास करून या संस्थेच्या काही लोकांना अटकही केली होती. अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झालेला अल् कायदा या जहाल दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचे उदात्तीकरण करताना नाईकने प्रत्येक मुस्लिमाने दहशतवादी व्हावे, तसेच भारतातील मुस्लिमांची संख्या ८० टक्के असावी, असे घातक विचारही भाषणातून व्यक्त केले होते.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, न्यायालय-गुन्हे, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google