Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » उत्तरप्रदेशात भाजपाच्या ४ परिवर्तन यात्रा

उत्तरप्रदेशात भाजपाच्या ४ परिवर्तन यात्रा

=२६५ पेक्षा जास्त जागांचे उद्दिष्ट=
bjp-flag-rallyनवी दिल्ली, [३ नोव्हेंबर] – उत्तर प्रदेश विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत ‘अब की बार भाजप सरकार’चा नारा निनादणार आहे. येत्या शनिवारपासून भाजपतर्ङ्गे राज्यात चार परिवर्तन यात्रा काढण्यात येणार असून, विधानसभेच्या २६५ हून अधिक जागांवर दणदणीत विजय संपादन करण्याचा त्यामागे हेतू आहे.
राज्यात बोकाळलेली गुन्हेगारी, भ्रष्टाचारी, कुशासन तथा लोकांच्या मूलभूत गरजांवर भाजपा लक्ष केंद्रीत करणार असून, परिवर्तन यात्रांच्या माध्यमातून उत्तरप्रदेशच्या विकासाचा अजेंडा जनतेसमोर मांडला जाणार आहे. बिहारच्या निवडणुकीत झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळत पुढील वर्षी होणार्‍या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे स्टार प्रचारक राहणार, यात शंकाच नाही. याशिवाय प्रादेशिक पातळीवर अनेक नेत्यांना प्रचार मैदानात उतरविले जाणार आहे. या निवडणुकीत सामूहिक नेतृत्वाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे भाजपने स्पष्ट केले. या यात्रांमध्ये बहुजन समाज पार्टी व समाजवादी पार्टीच्या राजवटीतील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीवर प्रकाशझोत टाकला जाईल.

शेअर करा

Posted by on Nov 4 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google