Home » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » उत्तर प्रदेशात राजकीय दिवाळी

उत्तर प्रदेशात राजकीय दिवाळी

=समाजवादी रॉकेट, मायावती बॉम्बची प्रचंड मागणी=
uttar-pradeshलखनौ, [२९ ऑक्टोबर] – विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या उत्तर प्रदेशातील दिवाळीवरही राजकीय रंग चढला आहे. लखनौसह अन्य प्रमुख शहरांमध्ये फटाक्याच्या बाजारपेठा सजल्या असून, समाजवादी रॉकेट्‌स आणि मायावती बॉम्बला प्रचंड मागणी मिळत आहे.
समाजवादी रॉकेट्‌सच्या पॅकेटवर सपाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचे छायाचित्र असून, ते ‘आऊटसायडर’ अमरसिंह यांना मिठाई चारत आहेत. तर, मायावती बॉम्बच्या पॅकेटवर बसपाच्या सर्वेसर्वा मायावती संतापाने लाल झालेल्या दाखविण्यात आल्या असून, त्यांच्या छायाचित्राच्या बाजूला ‘अँग्री बॉम्ब’ असे लिहिले आहे.
या दिवाळीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘अखिलेश की लडी अनलिमिटेड’ हे आहे. या पॅकेटमध्ये एक हजारावर फटाके आहेत. पॅकेटवर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे छायाचित्र आहे.
विधानसभेची निवडणूक अजूनही काही महिन्यांवर असली, तरी दिवाळीला सुरुवात झाली आहे आणि दिवाळीतच राज्यातील राजकीय वारे वाहू लागले आहेत. जनतेच्या मनात नेमके काय आहे, हे ओळखून त्यानुसार यावर्षीच्या दिवाळीत उत्पादकांनी अशा प्रकारचे फटाके बाजारात आणले असावेत, असे मत एका दुकानदाराने व्यक्त केले.
विविध शहरांमधील बाजारांमध्ये हे फटाके उपलब्ध असून, या सर्वांनाच ग्राहकांकडून प्रचंड मागणी मिळत आहे. या राजकीय दिवाळीमुळे इतर फटाक्यांना असलेली मागणी मात्र कमी झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

Posted by on Oct 30 2016. Filed under उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google