Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » उमेदवारीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

उमेदवारीचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

=आपच्या दोन नेत्यांविरुद्ध गुन्हा=
sexual_assaultनवी दिल्ली, [८ नोव्हेंबर] – दिल्लीत सत्तारूढ आम आदमी पार्टीतील अनेक नेते व आमदारांना महिलांवरील अत्याचाराच्या गुन्हांत अटक झाली असतानाच, या पक्षाच्या दोन नेत्यांनी निवडणुकीचे तिकिट देण्याचे आमिष एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
या पीडित महिलेने तिच्यावरील अत्याचाराची तक्रार रोहिणी दक्षिण पोलिस ठाण्यात दाखल केली. रामप्रताप गोयल आणि भूपेंद्र अशी या नेत्यांची नावे असून, पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही. विशेष म्हणजे, भूपेंद्र हे आपच्या आमदार राखी बिर्ला यांचे वडील आहेत.
ही महिला आपल्या पतीसोबत रोहिणी भागात राहाते. काही महिन्यांपूर्वी तिची भेट रामप्रताप गोयलशी झाली. त्यांच्यातील ओळख वाढत गेली. निवडणुकीचे तिकीट देण्याचे आश्‍वासन देऊन गोयलने आधी माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर अनेकदा त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले. मी जेव्हा निवडणुकीच्या तिकिटाबाबत विचारले, तेव्हा त्याने भूपेंद्रची भेट करवून दिली. तिकीट हवे असेल, तर भूपेंद्रलाही खुश कर, असे त्याने मला सांगितले. त्यानंतर दोघांनीही माझ्यावर वारंवार बलात्कार केला, असे तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 9 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google