Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » उस दरात उत्पादन खर्चानुसार वाढ करावी : राजू शेट्टी

उस दरात उत्पादन खर्चानुसार वाढ करावी : राजू शेट्टी

raju-shetty1पुणे, [३० ऑक्टोबर, (हिं.स)] – उसाच्या किफायतशीर व रास्त दरात (एफआरपी) उत्पादन खर्चानुसार वाढ करण्यात यावी, प्रमाणभूत साखर उतार्‍याच्या टक्केवारीत वाढ करू नये, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी कृषिमूल्य आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.
शेट्टी यांनी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा यांची नुकतीच भेट घेतली. हीं भेट आगामी २०१७-१८ च्या ऊसगाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली. कोणत्याही स्थितीत साखर उतार्‍याच्या साडेनऊ टक्के या आधारभूत प्रमाणात बदल न करण्याची मागणी त्यांनी या वेळी केली. राज्यातील काही साखर कारखान्यांनी तसेच त्यांच्या काही संघटनांनी हे प्रमाण साडेनऊवरून साडेदहा टक्के करण्याची मागणी केली आहे. त्यास शेट्टी यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या या काही नफा कमविण्याच्या उद्देशाने निर्माण झालेल्या नसल्याने त्यांना आयकर आकारण्यात येऊ नये, तसेच त्यांचे मूळ उद्देश सभासद शेतकर्‍यांचा विकास असल्याने त्यांना प्राप्तिकर आकारू नये, अशी शिफारस केंद्र सरकारला पाठविण्याची विनंती शेट्टी यांनी कृषिमूल्य आयोगाकडे केली असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावर ऊस उतार्‍याच्या प्रमाणभूत टक्केवारीत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आश्वासन आयोगाच्या अध्यक्षांनी दिले आहे. तसेच उसाच्या रास्त मूल्य दरात वाढ करण्याबाबत शिफारस पाठविलेली असून, ही बाब गोपनीय असल्यामुळे आज जाहीर करता येत नसल्याचे आयोगाच्या वतीने सांगण्यात आले.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google