Home » अर्थभारत, ठळक बातम्या » एअरटेल, आयडिया, वोडाफोनला ३१५० कोटींचा दंड

एअरटेल, आयडिया, वोडाफोनला ३१५० कोटींचा दंड

=रिलायन्स जिओला कनेक्टिव्हिटी नाकारली=
reliance-jio-4gनवी दिल्ली, [२२ ऑक्टोबर] – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने दूरसंचार क्षेत्रातील काही आघाडीच्या कंपन्यांना जोरदार दणका दिला आहे. सध्या देशभरातच लोकप्रिय झालेल्या रिलायन्स जिओला इंटर कनेक्टिव्हिटीची सुविधा उपलब्ध करू न दिल्याने ट्रायने एअरटेल, आयडिया आणि वोडाफोन या कंपन्यांवर ३१५० कोटींचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे.
या कंपन्यांनी रिलायन्स जिओला इंटर-कनेक्शन नाकारणे म्हणजे दूरसंचार सेवा कायद्याचा व परवान्यातील नियमांचे उल्लंघन करणे आहे, असे स्पष्ट करून ट्रायने शुक्रवारी दंडाची शिफारस करणारे पत्र दूरसंचार मंत्रालयाला पाठविले आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जिओला इंटर कनेक्शन नाकारल्यामुळे रिलायन्सला जे नुकसान झाले, त्याची भरपाई दंडाच्या रकमेतून करण्यात यावी, अशी शिफारसही ट्रायने केली आहे.
ट्रायची ही शिफारस मंत्रालयाने मान्य केल्यास वोडाफोन व एअरटेलला प्रत्येकी प्रती सेक्टर ५० कोटी याप्रमाणे २१ सेक्टरसाठी १०५० कोटी रुपये, तर आयडियाला प्रती सेक्टरसाठी ५० कोटी रुपये याप्रमाणे ९५० कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
रिलायन्स जिओने इतर टेलिकॉम कंपन्यांसंदर्भात लेखी तक्रार  ट्रायकडे दाखल केली होती. यानुसार, जिओच्या गरजेनुसार इंटर कनेक्टिव्हिटी पॉईंट उपलब्ध करून देण्यात या कंपन्या टाळाटाळ करीत असल्याचे नमूद केले होते. तथापि, या कंपन्यांनी जिओचे आरोप फेटाळले होते.

शेअर करा

Posted by on Oct 22 2016. Filed under अर्थभारत, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google