Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » एनडीटीव्हीवरील कारवाई राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून

एनडीटीव्हीवरील कारवाई राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांवरून

=२४ तासांच्या प्रक्षेपण बंदीचे व्यंकय्या नायडूंकडून समर्थन=
venkaiah-naidu_3चेन्नई, [५ नोव्हेंबर] – एनडीटीव्ही इंडिया हिंदी या हिंदी वाहिनीवर करण्यात आलेली कारवाई देशाच्या सुरक्षेच्या कारणांवरून करण्यात आली आहे, या शब्दात माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.
शनिवारी येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलताना नायडू म्हणाले, रालोआ सरकारला माध्यमांच्या स्वातंत्र्याबद्दल पूर्ण सन्मान आहे. परंतु एनडीटीव्हीच्या मुद्यावरून राजकारण खेळले जात आहे. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला बाधा पोहचू शकते, याचे भान विरोध करणार्‍यांनी ठेवायला हवे.
पठाणकोट हल्ल्याशी संबंधित ‘संवेदनशील’ माहितीचे प्रक्षेपण केल्याबद्दल आणि देशाची सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल हिंदी वृत्त वाहिनी एनडीटीव्ही इंडियाचे एका दिवसाचे प्रक्षेपण रोखण्याचा आदेश सरकारने दिला आहे. या नुसार, हिंदी वृत्त वाहिनी एनडीटीव्ही इंडियाला ९ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर या दरम्यान २४ तास आपले कुठलेही कार्यक्रम भारतात प्रसारित करता येणार नाहीत.
या निर्णयाला होत असलेल्या विरोधाला उत्तर देताना नायडू यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. नायडू म्हणाले,  राहुल गांधी यांच्यासारखे काही लोक आणिबाणीच्या काळ्या दिवसांची आठवण करीत आहेत, याचे मला आश्‍चर्य वाटते! आणिबाणी काय असते हे तुम्हाला ठाऊक आहे काय? आणिबाणीत जे लोक कॉंग्रेसमध्ये होते, त्यातील काही जण आज दुसर्‍या पक्षात आहेत आणि ते देखील आमच्यावर टीका करीत आहेत. प्रत्येक प्रसंगी सरकारवर आणि पंतप्रधानांवर टीका करण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो.
काही लोक वगळता सरकारच्या या निर्णयाचे जास्तीत-जास्त लोकांनी सोशल मीडियावर समर्थन केले आहे. पहिल्यांदाच अशी कारवाई झाल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. वाहिन्यांच्या प्रसारणावर यापूर्वी कितीदा रोख लावण्यात आली आहे, त्याची यादी मी आपणास वाचून दाखवू काय? असा सवालही यावेळी त्यांनी केला. एएक्सएन, एफटीव्ही, एंटर१०, एबीएन आंध्र ज्योती, अल जझीरा या वृत्त वाहिन्यांच्या प्रसारणांवरही यापूर्वी काही काळासाठी बंदी घालण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. आता मात्र सरकारला विरोध करणारे ‘लोकशाहीची हत्या’, ‘आणिबाणीच्या दिवसांची आठवण’ असे शब्दप्रयोग करीत आहेत. आपण या मुद्यावर उद्या संसदेत निवेदन करणार आहोत, अशी माहिती यावेळी व्यंकय्या नायडू यांनी यावेळी दिली.

शेअर करा

Posted by on Nov 6 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google