Home » कलाभारत, छायादालन, ठळक बातम्या » एस पी बालसुब्रमण्यम यांना पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार

एस पी बालसुब्रमण्यम यांना पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार

s-p-balasubrahmanyam-15नवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] – ख्यातनाम पार्श्‍वगायक एस पी बालसुब्रमण्यम यांना यंदाचा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे. गोव्यात होणार्‍या ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (आयएफएफआय) त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येईल. माहिती आणि प्रसारण मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी एका पत्रपरिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
गेल्या पाच दशकांपासून बालसुब्रमण्यम चित्रपट क्षेत्रात पार्श्‍वगायक म्हणून कार्यरत असून त्यांच्या अफाट गुणवत्तेमुळेच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचे व्यंकय्या नायडू यांनी सांगितले. आतापर्यंत त्यांनी ४० हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. हिंदीव्यतिरिक्त त्यांनी तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम भाषेतील गाणीही गायिली आहेत.
अतिशय मधुर आवाजाची देणगी लाभलेले ७० वर्षीय बालसुब्रमण्यम अतिशय परिश्रमी म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत त्यांना सहा वेळा सर्वश्रेष्ठ पार्श्‍वगायकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच सर्वाधिक गाण्यांचे रेकॉर्डिंग केल्याबद्दल त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण सारख्या प्रतिष्ठित नागरी पुरस्कारांनीही बालसुब्रमण्यम यांना भारत सरकारतर्फे सन्मानित करण्यात आले आहे. १९८० च्या दशकातील एक दुजे के लिये चित्रपटातील त्यांच्या आवाजातील गाणी रसिकांनी डोक्यावर घेतली होती. शिवाय १९९० च्या दशकातील हम आपके है कौन या चित्रपटातील त्यांच्या आवाजातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती.
गोव्यात ९ दिवस चालणार्‍या ४७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उदघाटन पोलंडचे दिग्दर्शक अँड्रेज वाजदा करणार आहेत. वाजदा यांनी अनेक पोलिश नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under कलाभारत, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google