Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » कमला हॅरिस होऊ शकतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष!

कमला हॅरिस होऊ शकतात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष!

=व्हाईट हाऊसमधील प्रवेशासाठी सक्षम, अमेरिकन माध्यमांद्वारे प्रशंसा=
kamala_harrisवॉशिंग्टन, [१२ नोव्हेंबर] – भारतीय वंशाच्या कॅलिफोर्नियाच्या अटर्नी जनरल कमला हॅरिस या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होण्यास सक्षम आहेत. त्यांनी सन २०२०मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढविली तर त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, असे अमेरिकन माध्यमांनी म्हटले आहे.
कमला हॅरिस या सिनेटमध्ये प्रवेश करणार्‍या  कॅलिफोर्नियातील भारतीय वंशाच्या पहिल्याच महिला ठरल्यात. सिनेट हे अमेरिकेचे वरिष्ठ सभागृह आहे. कमला हॅरिस यांनी नुकताच अमेरिकेच्या सिनेटमध्ये प्रवेश केला आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांना कडाडून विरोध करीत त्यांनी निवडणुकीत विजय मिळविला. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी कमला हॅरिस यांना ‘ट्रम्प विरुद्ध हिलरी’ लढतीत पाठिंबा दिला होता. ओबामा यांनी एका कार्यक्रमात कमला हॅरिस यांचे वर्णन ‘निडर महिला’ असे केले होते, हे विशेष.
अमेरिकेत राहणार्‍या कुठल्याही व्यक्तीबाबत  वर्ण, वंश वा इतर कोणत्याही  मुद्यांबाबत भेदभाव सहन करणार नाही. कायदेशीर दस्तऐवजाशिवाय अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या लाखो  लोकांना देशातून बाहेर काढणे ही घोषणा अव्यवहार्य आहे, अशी भूमिका कमला यांनी निवडणुकीदरम्यान घेतली होती.
कमला हॅरिस यांच्यात अमेरिकेच्या महिला राष्ट्राध्यक्ष होण्यास आवश्यक असलेला बाणा आहे. त्यांनी ओबामा यांच्या सहकार्याने प्रचार केल्यास त्या निश्‍चितच सन २०२०मध्ये अमेरिकेच्या अध्यक्ष म्हणून व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी स्तुती अमेरिकन माध्यमांनी केली आहे.
३ जानेवारी २०१७ रोजी कमला हॅरिस या सिनेट सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. ५१ वर्षीय कमला हॅरीस यांची आई भारतीय असून चेन्नई येथे त्यांच्या मातेचे वास्तव्य आहे. तर वडील जमैका येथे राहतात.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google