Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » कमार जावेद बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख

कमार जावेद बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख

वृत्तसंस्था
इस्लामाबाद, २६ नोव्हेंबर –
kamar-javed-bajwaपाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी कमर जावेद बाजवा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शनिवारी ही घोषणा केली. सध्याचे लष्करप्रमुख राहिल शरीफ हे २९ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. राहिल शरीफ यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा होता.
जावेद बाजवा पाकिस्तानचे १६वे लष्करप्रमुख आहेत. काश्मीरविषयक समस्यांचा त्यांना मोठा अनुभव असल्यानेच त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख निवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी कुणाची निवड होणार, याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होती. पाकिस्तानी माध्यमांनुसार, भारताविषयीचा दृष्टीकोन आणि भारत-पाकिस्तान संबंधांचा अभ्यास हे निकष या निवडीसाठी लावण्यात आले.
पाकिस्तानच्या नवीन लष्कर प्रमुखपदासाठी जुबैर हयात, इश्फाक नदीम अहमद, इकबाल रामदे आणि कमर बाजवा यांची नावे पुढे आली होती. अखेर कमार बाजवा यांची नियुक्ती झाली. दरम्यान, राहिल शरीफ यांना मुदतवाढ मिळेल, असे बोलले जात होते. पण ती मिळू शकली नाही. मुदतवाढ मिळण्याची चर्चा असतानाच, शरीफ यांनी त्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही, असे म्हटले जाते.

शेअर करा

Posted by on Nov 26 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google