Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » कर्नाटकचे मंत्री पॉर्न पाहण्यात व्यस्त !

कर्नाटकचे मंत्री पॉर्न पाहण्यात व्यस्त !

=व्हिडीओ झाला व्हायरल=
karnataka-education-minister-tanveer-sait-watches-pornबंगळुरू, [११ नोव्हेंबर] – एखाद्या कार्यक्रमात मंत्री किंवा नेत्यांनी डुलक्या घेण्याचे अनेक किस्से समोर आले आहेत. पण, कनाटकचे शिक्षणमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते तनवीर सैत एका कार्यक्रमात चक्क पॉर्न पाहण्यात व्यस्त असल्याचे आढळून आले. सैत यांचा अश्‍लील चित्र पाहतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
कर्नाटक सरकारच्या वतीने बंगळुरू येथे टीपू सुल्तान जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच अनुषंगाने आयोजित एका कार्यक्रमात सैत यांनाही बोलावण्यात आले होते. व्यासपीठावर वक्त्यांची भाषणे सुरू असताना सैत मात्र आपल्या मोबाईलवर चक्क पॉर्न पाहात असल्याचे आढळून आले. सैत यांनी मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे स्पष्टीकरण दिले. या कार्यक्रमात आपण व्हॉट्सऍप मॅसेज पाहात होतो, पॉर्न नाही, असं सैत यांनी स्पष्ट केले. तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणी सत्य जाणून घेण्यासाठी माहिती मागितली आहे.
कर्नाटकमधील ही पहिलीच घटना नाही. २०१२ मध्ये दोन मंत्री विधानसभेच्या कामकाजात मोबाईलवर पॉर्न पाहताना रंगेहात पडकले गेले होते. विधानसभेतील कॅमेरात हा प्रकार कैद झाला होता.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google