Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता

=गुप्तचर यंत्रणांचा केंद्राला इशारा=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १४ नोव्हेंबर –
detective-agencyजास्त मूल्यांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर नव्या नोटा प्राप्त करण्यासाठी देशभरात गोंधळ उडाला आहे. आगामी ४८ तासांत चलन पुरवठा सुरळीत झाला नाही, तर कायदा व सुव्यवस्थेची गंभीर स्थिती निर्माण होईल, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी केंद्र सरकारला दिला आहे.
लोकांची देशभरात पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी होत असलेली गर्दी पाहू जाता त्यांचा संयम सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसात चलन पुरवठा सुरळीत न झाल्यास एटीएम आणि बँकांबाहेर होणार्‍या गर्दीला सांभाळणे नियंत्रणाबाहेर जाईल, असा इशारा राज्यांनीही केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालातून दिला आहे.
देशातील हा गोंधळ पाहून स्वार्थी आणि असामाजिक तत्त्व सक्रिय झाले आहेत. सरकारच्या निर्णयाने ज्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे, ते आता नागरिकांना भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, झारखंड आणि बंगालमधील काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या संधीचा फायदा घेण्याच्या तयारीत आहेत, असे गुप्तचर यंत्रणांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
नक्षल्यांचा हैदोस असलेली राज्ये आणि दहशतवादग्रस्त जम्मू-काश्मिरात एटीएम लुटण्याचे प्रकार घडू शकतात. ही संपूर्ण स्थिती हाताळण्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचा सल्लाही गुप्तचरांनी दिला आहे. राज्यांनी देखील आपल्या अहवालातून आपात्‌कालीन सेवा, लग्न समारंभ, रुग्णालय आणि वृद्धांसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या इशार्‍यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. बँकांनाही या अहवालाची माहिती देण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 15 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google