Home » उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य » काला जादूमुळे अखिलेशवर राजकीय संकट

काला जादूमुळे अखिलेशवर राजकीय संकट

akhilesh-mulayam-shivpal-yadavलखनऊ, [२७ ऑक्टोबर] – उत्तरप्रदेशच्या राजकारणात शिवपाल यादव व अखिलेश यादव यांच्यात सुरू असलेल्या राजकीय युद्धादरम्यान काळी जादूसुद्धा चर्चेत आली आहे. काळी जादू केल्यामुळे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर राजकीय संकट ओढवले असून या काळी जादूपासून वाचण्यासाठी पूजा-अर्चना करण्यात येत आहे.
अखिलेश यादवला उद्ध्वस्त करण्यासाठी घरातीलच काही शत्रू त्याच्यावर काळी जादू करीत आहे, असे सपातून बाहेर काढण्यात आलेले नेते रामगोपाल यादव यांनी अखिलेश यादव व मुलायमसिंह यादव यांनी ताकीद देताना म्हटले होते.
तिकडे, अखिलेशच्या समर्थकांचेसुद्धा म्हणणे आहे की, त्यांचे काका शिवपाल अखिलेशला वेगळे करण्यासाठी काळी जादू करीत आहे.
दोन वर्षांपासून नेताजींवर तंत्रमंत्र करणारे दोन मांत्रिक आहेत. एक राजस्थानचा, तर दुसरा मध्य प्रदेशचा आहे, असे रामगोपाल यादवने मुलायम सिंगांना पत्र पाठवून सांगितले होते. अखिलेशचे वाईट होवो आणि नेताजी आपल्या वशात येवो, याकरिता सैफई येथे शिवपालच्या घरावर एक ट्रॅक्टरभर नारळ चढविण्यात आले होते, असेही या पत्रात रामगोपाल यांनी म्हटले आहे.
तिकडे अखिलेशची सावत्र आईच अखिलेशवर काळी जादू करीत आहे, असे अखिलेशचा जवळचा मानला जाणार्‍या उदयवीर सिंहने म्हटले. असे म्हटल्यामुळे रागातून उदयवीरला पक्षातून निलंबित करण्यात आले.
सैफई येथे गत काही वर्षात पूजा व हवन बर्‍याच मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यावरूनसुद्धा अनेक लोकांना वाटते की, काळ्या जादूची गोष्ट खरी आहे, असे मुलायमसिंह यांच्या शेजार्‍याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under उ.प्रदेश, छायादालन, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google