Home » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » काळा पैसा असणारेच संसदेची कोंडी करताहेत

काळा पैसा असणारेच संसदेची कोंडी करताहेत

=स्मृती इराणींचा घणाघाती आरोप=
वृत्तसंस्था
अहमदाबाद, १९ नोव्हेंबर –
HRD Minister Smriti Irani at press conferenceनोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करणार्‍या राजकीय पक्षांवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज जोरदार आसूड ओढला. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे ज्यांच्याजवळील काळा पैसा वाया गेला, तेच लोक या निर्णयाला विरोध करून संसदेच्या कामकाजाची कोंडी करीत आहेत, असा घणाघाती आरोप स्मृती इराणी यांनी केला.
कॉंगे्रसच्या नेतृत्वात एकवटलेले विरोधी पक्ष गेल्या दोन दिवसांपासून संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ घालत आहेत. स्वाभाविकच आहे, त्यांच्याजवळ असलेल्या काळ्या पैशाला आता कवडीची किंमत उरली नसल्याने त्यांच्या संतापाचा भडका उडणारच आहे आणि यातूनच ते संसदेला वेठीस धरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय देशाचे व्यापक हित लक्षात घेऊनच घेतला असल्याने सर्व पक्षांनी राजकीय मतभेद बाजूला सारावे आणि देशाच्या हितात कार्य करावे, असे आवाहनही इराणी यांनी केले. इराणी यांच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या नव्या मोहिमेचा भाग म्हणून आयोजित एका कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आल्या असता, त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
नोटाबंदीचा निर्णय काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधात सरकारने छेडलेले युद्धच आहे. गरिबांच्या घामाचा पैसा ज्यांनी भ्रष्ट मार्गाने आपल्या तिजोरीत साठवला आहे, त्यांना धडा शिकविण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि लांबचलांब रांगांमध्ये तासन्‌तास उभे राहून ते अप्रत्यक्षपणे या लढ्यात सहभागी झाले आहेत, असेही त्या म्हणाल्या.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google