Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मिरातील चकमकीत दोन अतिरेकी ठार

काश्मिरातील चकमकीत दोन अतिरेकी ठार

=दोन भारतीय जवान शहीद=
वृत्तसंस्था
श्रीनगर, २५ नोव्हेंबर –
jammu-kashmir-map-6जम्मू-काश्मीरच्या बांदीपूरा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले, तर लष्कराचे दोन जवान शहीद झाले.
सोपोर आणि बांदीपूर जिल्ह्यात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी जवान व पोलीसांनी संयुक्त मोहीम उघडली. बांदीपूरच्या एका भागात जवानांना पाहताच अतिरेक्यांनी गोळीबार केला. जवानांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी झडलेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले, अशी माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली.
या भागात आणखी काही अतिरेकी आहेत काय, याचा शोध घेण्यासाठी जवानांनी व्यापक मोहीम उघडली आहे. सोपोरमध्येही जवान आणि पोलिसांनी अतिरेक्यांविरोधात मोहीम राबवली असल्याचे प्रवक्ता म्हणाला.

एक अतिरेकी शरण
दरम्यान, सोपोरमध्ये एका स्थानिक अतिरेक्याने लष्करापुढे शरणागती पत्करली. आपण चहूबाजूंनी घेरल्या गेलो असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने शरण येण्याची तयारी दर्शवली आणि जवानांनीही त्यास होकार दिला. जवानांच्या कारवाईतून स्वत:चा बचाव करण्यासाठी अतिरेक्याने शरण येण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google