Home » छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मिरात रासायनिक हल्याची होती तयारी

काश्मिरात रासायनिक हल्याची होती तयारी

=अफजलच्या फाशीचा बदला घेण्याची योजना
=फुटीरतावाद्यांकडून मिळाली अतिरेक्यांना मदत,
वृत्तसंस्था
जम्मू, ३० नोव्हेंबर –
nagrota-terror-attackजम्मू शहराबाहेरील नाग्रोटा येथील लष्कराच्या तोफखाना विभागावर मंगळवारी झालेला भीषण हल्ला हा अफजल गुरूच्या फाशीचा बदला घेण्यासाठीच करण्यात आला होता. या हल्ल्यात अतिरेकी रासायनिक शस्त्रांचा वापर करणार होते. पण, त्याआधीच जवानांनी त्यांना यमसदनी धाडले.
या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांजवळून मिळालेल्या काही कागदांवर ‘आम्ही अफजलच्या फाशीचा बदला घेण्यासाठी आलो आहोत,’ असे उर्दू भाषेत स्पष्ट नमूद होते. याशिवाय, अतिरेक्यांजवळून भारतात तयार झालेल्या काही वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यावरून त्यांना स्थानिक फुटीरतावादी नेत्यांची मदत मिळाल्याचेही स्पष्ट होते. अतिरेक्यांना मदत करणार्‍यांचा गुप्तचर अधिकार्‍यांनी शोध सुरू केला आहे.
नाग्रोटा हा परिसर पाकिस्तानला जोडणार्‍या सीमेपासून अवघ्या ३० किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे, सीमा ओलांडल्यानंतर या अतिरेक्यांना येथे आणण्यासाठी अनेकांनी मदत केली असल्याचे दिसून येते. नाग्रोटा येथ आल्यानंतर अतिरेक्यांनी सुमारे सहा दिवस हल्ल्याची योजना आणि सराव केला. अतिरेक्यांनी जो पोलिस गणवेश घातला होता, तोदेखील सीमाभागातच तयार करण्यात आला होता, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
या हल्ल्याच्या तपासात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. तोफखाना विभागाच्या प्रवेश दारावर एकही जवान त्यावेळी तैनात नव्हता. त्यामुळे सुरक्षेत चूक झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, या प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google