Home » छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मिरात लष्कराची ‘स्कूल चलो’ मोहीम

काश्मिरात लष्कराची ‘स्कूल चलो’ मोहीम

=मोफत कोचिंगचीही सुविधा=
Army's 'School Chalo' operation in Kashmirअवंतीपुरा, [६ नोव्हेंबर] – बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर हिंसाचाराच्या आगीत होरपळलेल्या काश्मीर खोर्‍यात शांतता मोहीम यशस्वीपणे राबविल्यानंतर भारतीय लष्कराने आता ‘स्कूल चलो’ मोहीम हाती घेतली आहे. खोर्‍यातील काही निवडक भागांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत असून, याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत कोचिंग आणि अभ्यासक्रमाबाहेरील कार्यक्रमात सहभागी करून घेण्यात येत आहे.
आम्हाला केवळ सीमेवरील स्थितीच नाही, तर राज्यातील अंतर्गत स्थिती देखील हाताळायची आहे, याची जाणीव आहे आणि ऐच्छिक परिणामांसह आम्ही आपली जबाबदारी पार पाडत आहोत. आम्ही काही स्थानिक नागरिकांशी या मुद्यावर चर्चा केली असता, बहुतांश लोकांना त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता आणि सुरक्षा सतावत असल्याचे दिसून आले. या एकूणच स्थितीवर विचार करून मी आपल्या अधिकारी व जवानांना मुलांना शिक्षण पुरविण्याची व्यवस्था तातडीने उपलब्ध होईल, अशी ठोस योजना तयार करण्यास सांगितले आणि आता आम्ही ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती ‘व्हिक्टर फोर्स’चे जनरल ऑफिसर-ईन-कमांड मेजर जनरल अशोक नरुला यांनी दिली.
लष्कराने ऑगस्ट-सप्टेंबर या काळात कमीतकमी बळाचा वापर करून काश्मीर खोर्‍यातील बहुतांश भागात शांतता मोहीम राबवली होती. या मोहिमेला मोठे यशही प्राप्त झाले. अतिरेकी नेता बुरहान वाणीचा लष्कराने खात्मा केल्यानंतर सलग पाच महिने उसळलेल्या हिंसाचाराच्या आगीत आतापर्यंत ३४ शाळांना आगी लावण्यात आल्या असून, शैक्षणिक संस्था देखील बंद आहेत. अशा स्थितीत मेजर जनरल नरुला यांनी हाती घेतलेली ‘स्कूल चलो’ मोहीम प्रचंड लोकप्रिय ठरत असून, शेकडो विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वातील विविध तुकड्यांनी शिक्षकांची जमवाजमव केली असून, शाळा आणि समूदाय भवनांमध्ये लष्करी जवानांच्या कडेकोट सुरक्षेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे.
मी एक लष्करी अधिकारी असलो, तरी दोन मुलांचा बाप आहे. त्यामुळे लष्करी अधिकारी म्हणून नव्हे, तर एक पिता म्हणून मी हा उपक्रम हाती घेतला आहे. मुलांच्या हातात दगडांऐवजी पुस्तक आले, तर त्यांची नक्कीच प्रगती होईल, यावर माझा ठाम विश्‍वास आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google