Home » छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मीर खोर्‍यात जनजीवन पूर्वपदावर

काश्मीर खोर्‍यात जनजीवन पूर्वपदावर

=बाजारपेठांमध्ये गर्दी, नोटबंदीचा परिणाम नाही=
वृत्तसंस्था
श्रीनगर, १९ नोव्हेंबर –
people-in-kashmir-resume-normal-lifeकाश्मीर खोर्‍यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आल्याचे आढळून आले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर धावणारी वाहने, सरकारी कार्यालयांतील लगबग, गजबजलेल्या बाजारपेठा, दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली खरेदी असे चित्र अनुभववायास मिळाले.
चार महिन्यांच्या कालावधीनंतर लोकांचे जीवन सर्वसामान्य झाल्याने लोकांमध्येही उत्साह होता. फुटीरतावाद्यांची निदर्शने आणि बंद यामुळे चार महिन्यांपासून जनजीवन जणू ठप्पच होते. विशेष म्हणजे नोटबंदीचा परिणाम कुठेही आढळून आला नाही. सर्वाधिक गर्दी श्रीनगर येथील बाजारपेठांमध्ये आढळून आली.
खोर्‍यातील बहुतांश बाजारपेठा जुलैपासून बंद होत्या. आज जनजीवन पूर्वपदावर येताच लोक घराबाहेर निघाले. बँका आणि टपाल कार्यालयांत मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते, असे सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा केंद्रांपर्यंत जाण्यासाठी प्रथमच सार्वजनिक वाहनांचा उपयोग आज होताना दिसला.
हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी बुरहान वानी चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीर खोर्‍यात काही ठिकाणी अस्वस्थता कायम होती. काश्मीर खोर्‍यातील काही भागांत अजूनही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दले आणि पोलिस तैनात आहेत. मात्र, खोर्‍यात कुठेही संचारबंदी नसून प्रतिबंध हटविण्यात आले आहेत. फुटीरवादी नेत्यांनी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विरोध न करण्याचे धोरण स्वीकारले आहे, अशी माहिती सुरक्षा अधिकार्‍यांनी दिली.
तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे काश्मिरी नागरिकांना त्रास होत असल्याचे प्रतिपादन नुकतेच इस्लामाबादमध्ये केले होते. दोन्ही देशांनी चर्चेद्वारे काश्मीर प्रश्‍न सोडवावा, असे आवाहनही त्यांनी केले होते. या पार्श्‍वभूमीवर काश्मिरी नागरिक घराबाहेर पडत असतानाचे चित्र दिलासादायक होते.

शेअर करा

Posted by on Nov 20 2016. Filed under छायादालन, ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google