Home » कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य » केंद्रीय मंत्र्यांना बसला नोटबंदीचा फटका

केंद्रीय मंत्र्यांना बसला नोटबंदीचा फटका

=रुग्णालयाने नाकारल्या ५०० च्या जुन्या नोटा=
वृत्तसंस्था
बंगळुरू, २३ नोव्हेंबर –
sadananda-gowdaनोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील सर्वसामान्य जनता थोड्या फार प्रमाणात का होईना त्रस्त असतानाच, या निर्णयाचा फटका केंद्रीय सांख्यिकी मंत्री व्ही. सदानंद गौडा यांनाही बसला. भावाचा मृतदेह आणण्यासाठी रुग्णालयात गेलेले गौडा यांच्याकडून ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास रुग्णालयाने स्पष्टच नकार दिला.
मंगळुरूच्या कस्तुरबा मनिपाल रुग्णालयात आपल्या भावाचा मृतदेह आणण्यासाठी सदानंद गौडा गेले होते. पण रुग्णालयाने त्यांच्याकडून जुन्या घेण्यास नकार दिला. यामुळे सदानंद गौडांना पर्यायी व्यवस्था करावी लागली.
विशेष म्हणजे, देशभरातील सर्वच रुग्णालयांनी २४ नोव्हेंबरपर्यंत ५०० व एक हजाराच्या जुन्या नोटा स्वीकाराव्या, असा केंद्रीय अर्थमंत्रालयाचा आदेश आहे. पण, तो आदेश धुडकावून या रुग्णालयाने चक्क केंद्रीय मंत्र्यांनाच दणका दिला.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड थांबविण्यासाठी अर्थमंत्रालयाने जुन्या नोटा स्वीकारण्याची परवानगी रुग्णालयांना दिली होती. पण, सरकारच्या आदेशाचे पालन होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under कर्नाटक, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google