Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल काळा पैसाधारकांच्या पाठीशी

केजरीवाल काळा पैसाधारकांच्या पाठीशी

=भाजपाचा पलटवार=
gvl-narasimha-raoनवी दिल्ली, [१२ नोव्हेंबर] – ५०० व एक हजाराच्या नोटांवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर भाजपाने आज प्रखर टीका केली. काळा पैसा जमा करणार्‍या लोकांची केजरीवाल पाठराखण करीत असल्याचेच सिद्ध झाले आहे, असा पलटवार भाजपाने केला.
अशा प्रकारची टीका करण्याची केजरीवालांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अनेकदा असेच निराधार आरोप केले आहेत. पण, त्या आरोपांच्या समर्थनार्थ त्यांनी आजवर एकही पुरावा दिलेला नाही. त्यांची सवय माहीत असल्याने देशातील कोणीही त्यांच्या अशा बोलण्याकडे लक्ष आणि महत्त्वही देत नाहीत, असे भाजपाचे प्रवक्ते जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी सांगितले.
केजरीवालांनी आजपर्यंत जितके आरोप केले आहेत, त्याचा एकही पुरावा ते देऊ शकले नाही. निराधार आरोप करणे ही त्यांची सवयच झाली आहे. आपण भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात असल्याचा दावा ते करतात आणि केंद्र सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आजवरची सर्वात मोठी कारवाई केल्यानंतर त्यांना  यातही घोटाळा दिसून आला. यावरून त्यांनी आता काळा पैसाधारकांची पाठराखण सुरू केली असल्याचेच दिसून येते, अशी टीका त्यांनी केली.
केवळ देशातील सर्वसामान्य नागरिकांनीच नव्हे, तर जागतिक बँकेनेही भ्रष्टाचार व काळ्या पैशाविरोधात भारताने उचललेले हे सर्वात मोठे आणि सुधारणावादी पाऊल असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल मात्र यावर टीका करीत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या अनोख्या सर्जिकल स्ट्राईकचे केजरीवाल व त्यांची आम आदमी पार्टी देखील शिकार ठरले असल्याचेच संकेत मिळतात, असा चिमटाही त्यांनी काढला.

शेअर करा

Posted by on Nov 13 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google