Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » केजरीवाल, राहुल गांधींकडून मृतदेहाचेही राजकारण

केजरीवाल, राहुल गांधींकडून मृतदेहाचेही राजकारण

=व्ही. के. सिंह यांची टीका=
vk_singhनवी दिल्ली, [४ नोव्हेंबर] – केंद्र सरकारने लागू केलेल्या वन रँक वन पेन्शन योजनेचा लाभ मिळाल्यानंतरही एक माजी सैनिक विष प्राशन करून आत्महत्या करतो आणि त्याच्या मृतदेहावरून कॉंगे्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल राजकारण करतात, अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी आज शुक्रवारी केली.
कॉंगे्रस आणि आम आदमी पार्टीकडे आता कोणतेही मुद्दे राहिले नाही. तसेच या दोन्ही पक्षांना वन रँक वन पेन्शनविषयी फार जास्त माहिती देखील नाही. याच कॉंगे्रस पक्षाने माजी सैनिकांना लाभ देणारी ही योजना तब्बल ४२ वर्षे अडवून ठेवली होती आणि आता आम्ही ती लागू केल्यानंतर हाच पक्ष त्याबाबत गैरसमज पसरवित आहे, असा आरोपही सिंह यांनी केला.
राजकारण करण्यासाठी या नेत्यांना मुद्देदेखील कमी पडू लागले आहेत आणि म्हणूनच ते आता मृतदेहांचेही राजकारण करू लागले आहेत. आत्महत्या करणार्‍या ज्या माजी सैनिकाच्या पार्थिवावरील अंत्यविधीत राहुल गांधी व केजरीवाल सहभागी झाले, ते यापूर्वी शहीद झालेल्या एका तरी जवानाच्या अंत्यविधीत सहभागी झाले होते काय, असा प्रश्‍न पत्रकारांनी त्यांना विचारायलाच हवा, असे परखड मतही त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
भारतीय सीमांचे रक्षण करताना आतापर्यंत इतके जवान शहीद झाले, पण या नेत्यांकडे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीही वेळ नव्हता आणि आता ते एका माजी सैनिकाच्या आत्महत्येचे राजकीय भांडवल करीत आहेत. त्यांच्या बोलण्यात काहीच अर्थ नाही, असेही ते म्हणाले.

शेअर करा

Posted by on Nov 5 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google