Home » छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » केरळातील राजकीय हत्यांमागे कम्युनिस्टच

केरळातील राजकीय हत्यांमागे कम्युनिस्टच

  • रा. स्व. संघाचा स्पष्ट आरोप
  • अ. भा. कार्यकारी मंडळाची बैठक सुरू

RSS meeting in Hyderabadहैदराबाद, [२३ ऑक्टोबर] – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला आज रविवारपासून येथे प्रारंभ झाला. केरळातील राजकीय हत्या राजकीय हेतूने होत असून, यामागे कम्युनिस्टांचाच हात आहे, असा स्पष्ट आरोप यावेळी संघाने केला.
तीन दिवसीय बैठकीच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना रा. स्व. संघाचे सह-सरकार्यवाह भागय्या म्हणाले की, बंगालमध्ये दुर्गा पूजेच्या काळात काही जिहादी तत्त्वांनी हिंदूंवर केलेले हल्ले आणि तामिळनाडूत अन्य हिंदू संघटनांच्या सदस्यांची झालेली हत्या यावरही बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
समाजातील विविध घटकांसाठी संघाने केलेल्या कार्याचा व संघटनान्मक विस्ताराचा आढावा घेण्यासोबतच धार्मिक, सांस्कृतिक जागरूकता, कौटुंबिक मूल्यांची बांधणी, एकात्मिक गाव विकास आणि अन्य सामाजिक मुद्यांवर तसेच हिंदू समाज व देशाशी निगडित विषयांवरही या वार्षिक बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
असहिष्णू कम्युनिस्ट विशेषत: केरळातील मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वातील माकपचे कार्यकर्ते, हिंदूंच्या विशेषत: संघ आणि भाजपाच्या सदस्यांच्या राजकीय हेतूने प्रेरित होऊन हत्या करीत आहेत आणि त्यांच्या संपत्तीचेही नुकसान करीत आहेत. यावरील ठराव बैठकीत पारित करण्यात येणार आहे. दुसरा ठराव एकात्म मानव दर्शन या विषयाशी संबंधित राहणार आहे, अशी माहिती भागय्या यांनी दिली.
भारतीय तत्त्वज्ञानावर आधारित ‘एकात्म मानव दर्शन’ या विचारांचा प्रचार करणारे पं. दीनदयाय उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीचे हे वर्ष आहे. सोबतच, या विचारांचेही ५१ वे वर्ष आपण साजरे करणार आहोत. या तत्त्वज्ञानामुळे शाश्‍वत विकास, शाश्‍वत उपभोग आणि निसर्गाला मानवी वागणूक यावरील वैश्‍विक दृष्टिकोन प्राप्त झाला आहे.
अल्पसंख्यक समूहातील काही लोकांकडून हिंदू तरुणींचा विनयभंग आणि हत्या यासारख्या घटना घडत आहेत. यातील बहुतांश पीडित, बंगालमधील अनुसूचित जाती/जमातीच्या तरुणी आहेत. तेथील तृणमूल कॉंगे्रस सरकारच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार सुरू आहे. कोलकाता उच्च न्यायालयानेही दुर्गा मूर्तीच्या विसर्जनावर तृणमूल सरकारने घातलेल्या बंदीवर कडक ताशेरे ओढले आहेत. बहुसंख्यकाचे हित दुर्लक्षित करून अल्पसंख्यकांचे लांगूनचालन करू नका, असेही सुनावले आहे. जातीच्या आधारावर मतभेद करणे मानवताविरोधी व घटनाबाह्य आहे, असे संघाचे ठाम मत आहे. हिंदू शास्त्रातही अशा मतभेदांना कुठेच स्थान नाही, याकडेही भागय्या यांनी लक्ष वेधले.
रा. स्व. संघाने स्थानिक मुद्यांचीही सोडवणूक केली आहे. सर्व हिंदूंना स्मशानभूमी, जल मंडळ उपलब्ध आहे काय, तसेच मंदिरात प्रवेश मिळतो काय, यावरही संघाने सर्वंकष सर्वेक्षण केले आहे. अल्प प्रमाणात असलेल्या हिंदू समाजाला सरकारकडून अनुदान मिळावे, यासाठी संघ वचनबद्ध आहे. त्याचप्रमाणे अनु. जाती व जमातीचे सक्षमीकरण करण्यासाठी संघ अन्य संघटनांसोबतही काम करीत आहे, असे भागय्या यांनी सांगितले.
सरसंघचालकांनी केले बैठकीचे उद्‌घाटन
तत्पूर्वी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी अ. भा. कार्यकारी मंडळाच्या तीन दिवसीय बैठकीचे उद्‌घाटन केले. देशाच्या प्रत्येक राज्यातून संघाचे किमान ४०० कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित झाले आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, रा. स्व. संघ, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google