Home » केरळ, ठळक बातम्या, राज्य » केरळ मेडिकल कॉलेजमध्ये जीन्स, टीशर्टला बंदी

केरळ मेडिकल कॉलेजमध्ये जीन्स, टीशर्टला बंदी

=विद्यार्थिनींचा कडाडून विरोध=
jeansतिरुवनंतपुरम्, [२२ ऑक्टोबर] – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने एमबीबीएस विद्यार्थिनींना जीन्स टीशर्ट आणि लेगिंग घालण्यावर बंदी घातली आहे. तसेच महाविद्यालयाच्या परिसरात पांढरा एप्रन घालणे व ओळखपत्र गळ्यात सतत घालणेही अनिवार्य केले आहे.
महाविद्यालयाने विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठी एक नियमावलीच जारी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात केवळ फॉर्मल कपडे आणि फॉर्मल शूज घालून यावे असे म्हटले आहे तर विद्यार्थिनींनी महाविद्यालयात येताना केवळ साडी किंवा चूडीदार घालाव, कोणत्याही प्रकारची केशरचना न करता साधा आंबाडा घालावा, मोठमोठे दागिने घालू नये असे अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत.
दरम्यान, या सर्व निर्बंधांना विद्यार्थ्यांकडून मात्र कडाडून विरोध सुरू झाला आहे. कॉन्फेडरेशन ऑफ मेडिकल कॉलेज डॉक्टर्सचे संतोष कुमार यांनी प्रातिनिधीक स्वरूपात मत मांडताना म्हटले आहे, आपला देश विविध संस्कृतींनी बनलेला आहे. नव्या काळात आपल्याला अधिक खुलेपणा अंगिकारायला हवा. जीन्सला विरोध का असा सवालही त्यांनी केला असून, महाविद्यालयाने ड्रेसकोड ठेवणे गैर नाही परंतु तो किमान सुसंगत तरी असावा असे म्हटले आहे.
डॉ.थॉमस मॅथ्यू, प्रिंसिपल
कॉलेजमध्ये ड्रेसकोड काही नवी बाब नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी त्याचे पालन करत नव्हते. मात्र आता आम्ही हा ड्रेसकोड अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या संक्रमणापासून सुरक्षित ठेवणे व मुलींना मवाल्यांपासून वाचविणे असा आहे.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under केरळ, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google