Home » ठळक बातम्या, बंगाल, राज्य » कोलकात्यात ५००, १००० हजाराच्या नोटा रस्त्यावर फेकल्या

कोलकात्यात ५००, १००० हजाराच्या नोटा रस्त्यावर फेकल्या

वृत्तसंस्था
कोलकाता, [१३ नोव्हेंबर] –
two-sack-full-of-currency-notes-of-rs-500-and-rs-1000-on-roadपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद ठरविल्यानंतर काळा पैसा जमा करणार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. घरात साठवून ठेवण्यात आलेला काळा पैसा आता कचरा झाला असल्याने आणि तो बाहेरही काढता येत नसल्याने अनेकांनी हा पैसा रस्त्यावर आणि नद्यांमध्ये फेकला आहे. कोलकात्यातील लोकांनी मात्र त्यांच्याजवळील काळा पैसा चक्क कचरा पेटीत टाकला आहे.
अनेकांनी जास्त पैसे मोजून सोन्याची खरेदी केली, तर अनेकांनी मंदिरांमधील दान पेट्यांमध्ये ५०० व हजाराच्या नोटा टाकल्या. पण, आयकर खात्याची नरज जाताच हे सर्व मार्ग बंद झाले. उत्तरप्रदेशातील गंगा नदीतही हजाराच्या नोटा तरंगताना दिसल्यानंतर पोलिसांनी नद्यांवरही आपली नजर केंद्रीत केली आहे. त्यामुळे घरातील कचरा ज्या पिशवीत भरल्या जातो, त्याच पिशव्यांमधून लोक या नोटा कचरा घरात फेकत आहेत. कोलकात्यात एका कचर्‍याच्या डब्यात पाचशे आणि हजारोंच्या असंख्य नोटा आढळून आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. या नोटा उचलण्यासाठी अनेकांनी धाव घेतली, पण फेकण्याआधी त्या दोन भागांमध्ये फाडण्यात आल्याने लोकांची निराशा झाली आणि जड अंत:करणाने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
कोलकात्यातील गोल्फग्रीन भागात हा प्रकार घडला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नोटांचे सर्व तुकडे जमा केले. या परिसरातील कोणी हा पैसा फेकला असावा, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under ठळक बातम्या, बंगाल, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google