Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » क्लिटंन यांच्यामुळे तिसरे महायुद्ध होईल

क्लिटंन यांच्यामुळे तिसरे महायुद्ध होईल

=डोनॉल्ड ट्रम्प यांचा आरोप=
trump-clintonवॉशिंग्टन, [२६ ऑक्टोबर] – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वात आघाडीवर असलेल्या  डेमॉक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार हिलरी क्लिटंन यांच्या सीरियावरील परराष्ट्र व्यवहार धोरणामुळे तिसरे महायुद्ध होईल, असा आरोप रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील महाचर्चेच्या दोन फेर्‍यांमध्ये माघारी पडलेल्या ट्रम्प यांनी तिसर्‍या महाचर्चेसाठी आपल्या प्रचाराची धार अधिकच तीव्र केली आहे. हिलरी क्लिटंन यांच्यावर नवीन आरोप करताना ते म्हणाले की, क्लिटंन याचे सीरीया संदर्भातील परराष्ट्र धोरण अतिशय घातक असून, ते तिसर्‍या महायुद्धाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.
तुम्ही जर सीरियाविरुद्ध युद्ध पुकारायचे म्हटले, तर ते केवळ सीरियासोबतचे युद्ध राहणार नसून सिरीया, रशिया आणि इराण सोबतचे युद्ध राहील. रशिया ही अण्वस्त्रसंपन्न देश आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, ट्रम्प यांच्या टीकेला उत्तर देताना क्लिटंन यांनी डेमॉक्रॅटिक पार्टीसह रिपब्लिकन पार्टीच्या सुरक्षा तज्ज्ञांनीही ट्रम्प यांचे नेतृत्त्व अमान्य केली असल्याचे सांगितले.

शेअर करा

Posted by on Oct 27 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google