Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गरज भासल्यास जनतेने बंदूक उचलावी

गरज भासल्यास जनतेने बंदूक उचलावी

=काटजू यांचे आणखी एक वादग्रस्त विधान=
markandey-katjuकानपूर, [२२ ऑक्टोबर] – आता मत आणि निवडणुकीचा काळ संपला आहे. प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार आणि अऩ्याय आहे. आता क्रांतीची आणि बंदुकीची गरज आहे. लढाई लढल्याशिवाय काहीच होणार नाही. आता बंदूक चालेल. गरज भासल्यास जनतेने बंदूक उचलावी, असे प्रतिपादन सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व प्रेस कौन्सील ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिलेले न्या. मार्कंडेय काटजू यांनी केले.
न्या. काटजू हे शुक्रवारी आयआयटी कानपूर येथे आयोजित अंतराग्नि २०१६ या सांस्कृतिक महोत्सवात टॉक शोमध्ये थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, आता देश सांभाळायचा असेल तर एका नवीन क्रांतीची गरज आहे. मात्र त्याकरिता बलिदान द्यावे लागेल. बहुदा पूर्वीच्या क्रांतीमध्ये झालेल्या नुकसानीपेक्षा या क्रांतीमध्ये अधिक नुकसान होईल.
देशातील ५० ट्नके खासदार गुन्हेगार आणि १०० ट्नके खासदार भ्रष्ट आहेत. देशाची न्यायप्रणाली आणि प्रशासकीय व्यवस्थासुद्धा पूर्णपणे भ्रष्ट आहे, असेही काटजू म्हणाले.
गांधीजी इंग्रजांचे एजंट व सर सैय्यद अहमद खां समर्थक होते, असे ते म्हणाले. चीनच्या क्रांतीचा हवाला देत ते म्हणाले की, त्या काळात जितके प्राण गेले होते, बहुदा त्यापेक्षा अधिक प्राणांची आहुती या क्रांतीत द्यावी लागेल, परंतु क्रांती व्हायला पाहिजे. लढाईविना काही प्राप्त होणार नाही. हे सोपे नाही, परंतु करावे लागेल.
एका विद्यार्थ्याने अरविंद केजरीवाल यांच्याबाबत प्रश्‍न विचारला तेव्हा त्यांनी बिनद्निकतपणे केजरीवाल यांना फ्रॉड असल्याचे म्हटले. आधी मला वाटायचे की, केजरीवाल राजकारणाला नवीन आयाम देईल, परंतु हा सर्वांचाच खेळाडू निघाला.

शेअर करा

Posted by on Oct 23 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google