Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » गर्दी: पगारासाठी अन् सोन्यासाठी!

गर्दी: पगारासाठी अन् सोन्यासाठी!

वृत्तसंस्था
मुंबई/ नवी दिल्ली, १ डिसेंबर –

Bhopal: People quesue up inside a bank to withdraw cash in Bhopal on Thursday. PTI Photo(PTI12_1_2016_000201B)

मुंबई, नवी दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आज गुरुवारी एटीएमच्या पुढ्यात आणि बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पगाराचा दिवस असल्याने ही गर्दी होती. तर, दुसरीकडे सोन्याच्या भावात घसरण झाल्याने अनेक महानगरांनी सोने खरेदीसाठी ग्राहकांची ‘गोल्ड रश’ अनुभवली.
आज गुरुवारी महिन्याचा पहिला दिवस असल्याने लोकांनी पगाराची रक्कम काढण्यासाठी गर्दी केली होती. कर्मचार्‍यांचा विशेषत: सरकारी कर्मचार्‍यांच्या पगाराचा नोटबंदीनंतरचा हा पहिलाच दिवस होता, हे येथे उल्लेखनीय!
पुरेशा प्रमाणात आपल्याला पैसे काढता आले नाही, अशी अनेकांची विशेषत: निवृत्तीवेतनधारकांची तक्रार होती. बँकांमधील रोख रक्कम संपण्याच्या आत आपल्याला पैसे मिळावेत, अशी भावना बर्‍याच जणांनी बोलून दाखविली.
बहुतांश एटीएम केंद्रे रोख रकमेअभावी बंदच होती. नोकरपेशा मंडळींना दररोज बँकेत जाणे अडचणीचे असते. पगाराचा दिवस असल्याने आज तरी पुरेशा प्रमाणात रक्कम मिळायला हवी होती. मात्र, आमच्यापैकी काहींना दोन हजार, तर काहींना पाच हजार रुपयेच काढता आले. बँकांमध्ये रोख रक्कम कमी प्रमाणात असल्याने आपल्याला २४ हजार रुपयांच्या मर्यादेचा उपयोग करता आला नाही, असा अनेकांच्या बोलण्याचा सूर होता.
जास्तीत जास्त लोकांना पैसे काढता यावेत, म्हणून काही बँकांनी दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम पगारादाखल वितरित केली. रोख रकमेसाठी आम्ही हा ‘रेशनिंग’चा पर्याय निवडला असे एका ज्येष्ठ बँक अधिकार्‍याने सांगितले. सुमारे ८० टक्के एटीएम मशीन्सची फेररचना पूर्ण झाली असली तरीही रोख रक्कम नसल्याने त्यांचा उपयोग झाला नाही.

आज गुरुवारी सोन्याच्या दरामध्ये मागील सहा महिन्यातील विक्रमी घट झाल्याने अनेक महानगरांमध्ये सोने खरेदीसाठी झुंबड उडाली होती. १० ग्रॅमचे सोन्याचे दर आज २९ हजार रुपये होते. बुधवारच्या दरात आज गुरुवारी ३५० रुपयांनी घसरण झाली.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google