Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » गुलाम काश्मिरातील धरणाचे बांधकाम

गुलाम काश्मिरातील धरणाचे बांधकाम

♦पाकच्या स्वप्नातील प्रकल्पाला तडा
♦आसियान विकास बँकेने निधी नाकारला,
asian-development-bankइस्लामाबाद, [२७ ऑक्टोबर] – गुलाम काश्मिरातील सिंधू नदीवर १४ अब्ज डॉलर्स खर्च करून मोठे धरण बांधण्याच्या पाकिस्तानच्या योजनेला मोठा धक्का बसला आहे. या धरणाच्या बांधकामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यास आसियान विकास बँकेने स्पष्ट नकार दिला आहे.
सिंध नदी भारतातून वाहात असल्यामुळे त्यावर कोणतेही धरण बांधण्यासाठी भारताकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करणे अनिवार्य असते. पण, अशा प्रकारचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यास पाकने नकार दिल्यामुळे दोन वर्षांपूर्वी जागतिक बँकेनेही पाकला निधी देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता आसियान विकास बँकेनेही पाकला नकार दिल्याने पाकच्या स्वप्नातील धरणालाच तडा गेला आहे.
पाकला या धरणासाठी निधी देण्याची कोणतीही ठोस हमी आम्ही देऊ शकत नाही. कारण, हा फार मोठा आणि अतिशय खर्चीक प्रकल्प आहे, असे आसियान विकास बँकेचे अध्यक्ष टाकेहिको नाकौ यांनी पाकचे अर्थमंत्री इशक दार यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रपरिषदेत स्पष्ट केले. मध्य आशिया प्रादेशिक आर्थिक सहकार्य कार्यक्रमावरील १५ व्या मंत्रिस्तरीय बैठकीनंतर ते बोलत होते.
गुलाम काश्मीरच्या गिलगिट बाल्टिस्थानमधील सिंधू नदीवर उभारण्यात येणारा हा प्रस्ताविक प्रकल्प पाकच्या ऊर्जा आणि सिंचनविषय गरजा पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, याची जाणीव आम्हाला आहे. पण, पाकने जास्तीतजास्त भागीदार उभे करून ४५०० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या या प्रकल्पाच्या निधीचा मार्ग मोकळा करायला हवा, अशी भूमिका नाकौ यांनी विशद केली.
या प्रकल्पासाठी पाकला फार मोठ्या निधीची गरज असल्याने इतका प्रचंड निधी द्यायला हवा काय, यावर आम्ही अद्याप कोणताही विचार केला नाही. तथापि, नंतरची स्थिती कशी राहील, यावर आधारित आम्ही निर्णय घेऊ शकू, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाकमधील आघाडीच्या डॉन दैनिकाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. आंतरराष्ट्रीय विकासावरील अमेरिकेची संस्था सध्या या प्रकल्पाच्या लवचिकतेचा अभ्यास करीत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
विशेष म्हणजे, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकरिता विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यातही पाक सरकार सातत्याने अपयशी ठरत आहे. पाक सरकारने दोन वर्षांपूर्वी याच प्रकल्पाकरिता जागतिक बँकेचे उंबरठे अनेकदा झिजविले आहेत. पण, भारताकडून जोपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला एक पैसाही देऊ शकत नाही, अशा शब्द शब्दात बँकेने पाकला ठणकावले होते.

शेअर करा

Posted by on Oct 28 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google