Home » क्रीडा, ठळक बातम्या » गोलंदाजांची नेत्रदीपक कामगिरी : विराट कोहली

गोलंदाजांची नेत्रदीपक कामगिरी : विराट कोहली

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर –
virat-kohli-testदुसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडवर २४६ धावांनी जबरदस्त विजय मिळवून देण्यात गोलंदाजांनी नेत्रदीपक कामगिरी बजावली या शब्दात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गोलंदाजांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. फिरकीपटूंनी या सामन्यात १५ गडी टिपल्याचा विशेष उल्लेखही विराट याने यावेळी करून त्यांची पाठ थोपटली.
विशाखापट्टणम कसोटीत रविचंद्रन अश्‍विन याने आठ, जयंत यादवने ४ आणि रवीन्द्र जडेजाने ३ असे एकूण १५ गडी फिरकीपटूंनी बाद केले. लढत जिंकण्यात या तिघांचा सिंहाचा वाटा असला तरी विराटचे मन जिंकले ते नवोदित जयंत यादवने. जयंतने केवळ गोलंदाजीनेच मन जिंकले असे नसून त्याने पहिल्याच कसोटीत लढवैया खेळाडूचे गुणही दाखवून दिले अशी प्रशंसा विराटने केली.
प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविण्यात संपूर्ण संघाचाच वाटा असतो. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही बाजूत भारत सक्षम होता. राजकोट कसोटी कशीबशी वाचविण्यात भारताला यश आले तेव्हा विराट कोहलीच्या नेतृत्वावर टिकाकार प्रश्‍न उपस्थित करीत होते. हे येथे विशेष.
राजकोटमध्ये झालेल्या टिकेनंतर कर्णधार विराट कोहली याने संघात दोन बदल केले होते. लेग स्पिनर अमित मिश्राच्या जागेवर ऑफ स्पिनर जयंत यादवला आणि सलामीचा फलंदाज गौतम गंभीरच्या जागेवर लोकेश राहुलला पहिल्या अकरा खेळाडूत स्थान दिले होते.  जयंत यादवला संघात स्थान देताच पुन्हा टिकेचा मारा सुरू झाला होता. पण सर्व टिकाकारांना जयंत यादवने आपले कौशल्य सादर करून चोख उत्तर दिले.
इंग्लंड संघावर २४६ धावांनी मोठा विजय मिळविल्यानंतर पत्रकारांशी बातचित करताना विराट कोहली आत्मविश्‍वासाने म्हणाला की, आम्ही पाच गोलंदाजांना खेळविण्याचा घेतलेला निर्णय खरा उतरला. या कसोटीत विशेष लक्ष वेधले ते वेगवान गोलंदाजांनी. त्यांनी जे कसब सादर केले ते विशेष ठरले. कसोटीत पदार्पण करणार्‍या फिरकीपटू जयंत यादवने पदार्पणातच छान कामगिरी बजावली. ही एक उपलब्धी ठरली आहे.
सामनावीर ठरलेला विराट कोहली म्हणाला की, जयंत यादवने केवळ गोलंदाजीतच नव्हे तर फलंदाजीतही महत्वाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात एक गडी घेतला व ३५ धावा काढल्या. तर दुसर्‍या डावात ३ गडी टिपले व २७ धावाही नोंदविल्या.

शेअर करा

Posted by on Nov 22 2016. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google