Home » गोवा, ठळक बातम्या, राज्य » गोवा : पोर्तुगीज नागरिकत्वामुळे ५१० नावे वगळली

गोवा : पोर्तुगीज नागरिकत्वामुळे ५१० नावे वगळली

=निवडणूक आयोगाचा निर्णय=
वृत्तसंस्था
पणजी, २० नोव्हेंबर –
electioncommissionofindiaपोर्तुगीज नागरिकत्व असलेल्या ५१० मतदारांची नावे गोव्याच्या मतदारयादीतून रद्द करण्यात आली आहेत. पोर्तुगालचे नागरिकत्व त्यांना मिळाल्याने हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या मध्ये उत्तर गोव्यातील १८९ नागरिकांचा आणि दक्षिण गोव्यातील ३२१ नागरिकांचा समावेश आहे. पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोव्याचा समावेश भारतात १९६१साली झाला होता, हे येथे उल्लेखनीय.
गोव्याच्या मतदारयादीत १९ हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. गोवा विधानसभेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रथमच हे मतदार मतदान करणार आहेत. ज्या नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे ते १८ व १९ वयोगटातील आहेत. गोव्याची एकूण मतदारसंख्या १० लाख ८५ हजार २७१ एवढी झाली असून २५ हजार १७ मतदारांची नावे विविध कारणांवरून मतदार यादीतून काढून टाकल्याचे मुख्य  निवडणूक अधिकारी कुणाल कुमार यांनी शनिवारे येथे सांगितले.
मतदार यादीची पुनर्रचना करण्यात आली असून मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी संपूर्ण गोव्यात शिबिरे घेण्यात  आली होती. शासकीय अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था यांना विश्‍वासात घेऊनच ही फेररचना करण्यात आली आहे. ज्यांचा मृत्यू झाला आहे वा इतरत्र बदली झाली आहे, अशांची नावे रद्द करण्यात आली आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under गोवा, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google