Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » घाबरू नका, तुमच्या घामाचा पैसा सुरक्षित

घाबरू नका, तुमच्या घामाचा पैसा सुरक्षित

=सरकारची देशवासीयांना ग्वाही=
finance-ministryनवी दिल्ली, [११ नोव्हेंबर] – ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या असल्या तरी, घाबरण्याचे काही कारण नाही. तुमच्या श्रमाचा पैसा पूर्णपणे सुरक्षित आहे. अडीच लाख रुपयांपर्यंतची रक्कम तुम्ही आपल्या बँकेत जमा करा, याबाबतची माहिती आयकर विभागाला अजिबात देण्यात येणार नाही, अशी ग्वाही केंद्र सरकारने आज शुक्रवारी देशवासीयांना दिली.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या आश्‍वासनाला बळी पडू नका आणि त्याच्या खात्यात आपला पैसाही जमा करू नका. फसवणूक आणि अन्य प्रकारच्या अफवांपासून स्वत:ला दूर ठेवा, असे आवाहन अर्थमंत्रालयातर्फे करण्यात आले.
कृषी क्षेत्रापासून मिळणारे संपूर्ण उत्पन्न करमुक्त असल्याने त्यातून मिळणारे सर्वच पैसे नागरिकांनी निर्भयपणे बँक खात्यात जमा करावे. याशिवाय, लहान व्यावसायिक, गृहिणी, कलाकार आणि कामगार वर्गानेही त्यांच्याजवळ असलेली रोख रक्कम निर्भयपणे बँकेत जमा करावी, असेही अर्थमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अडीच लाखांपर्यंतच्या ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा जमा करणार्‍यांना काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण, त्यांच्या या पैशाबाबतची माहिती आयकर खात्याला अजिबात मिळणार नाही. हा पैसा कोठून आला, कसा आला, याची चौकशी देखील होणार नाही. कष्टाने पैसा मिळविणार्‍या प्रामाणिक नागरिकांना पूर्ण संरक्षण मिळेल, अशी ग्वाही यात देण्यात आली आहे.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google