Home » छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » चंद्रापर्यंत पाचवेळा रस्ता होऊ शकतो, एवढ्या जुन्या नोटा!

चंद्रापर्यंत पाचवेळा रस्ता होऊ शकतो, एवढ्या जुन्या नोटा!

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २५ नोव्हेंबर –
bloomberg-business-newsपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि एक हजार रुपयाच्या नोटा चलनातून हद्दपार केल्या. या जुन्या नोटा देशभरातील विविध बँकांमध्ये जमा केल्या जात आहेत. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेकडे ५०० व हजाराच्या सुमारे २३ अब्ज जुन्या नोटा जमा होतील. या नोटांचे काय करायचे, हा प्रश्‍न आरबीआयसमोर असला, तरी या सर्व नोटांपासून पृथ्वी ते चंद्रापर्यंत जाण्या-येण्याचा रस्ता तब्बल पाचवेळा तयार केला जाऊ शकतो…!
आंतरराष्ट्रीय बिझनेस न्यूज ‘ब्लूमबर्ग’ या कंपनीने हा आश्‍चर्यकारक अहवाल दिला आहे. ५०० आणि एक हजाराच्या जुन्या नोटा पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पसरविण्यात आल्या, तर जाण्या-येण्याचा रस्ता पाच वेळा तयार केला जाऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर ३ लाख ८४ हजार ४०० किलोमीटर इतके आहे. तर जुन्या नोटा एकावर एक ठेवल्यास त्यांची उंची २६ लाख ५४ हजार मीटर होईल, असे या कंपनीच्या अहवालात नमूद आहे.
चौकट एक
माऊंट एव्हरेस्टपेक्षा ३०० पट जास्त उंचीच्या!
जुन्या नोटांची उंची जगातील सर्वात उंच शिखर अर्थात माऊंट एव्हरेस्टलाही मात देईल. जुन्या नोटा माऊंट एव्हरेस्टपेक्षा ३०० पट जास्त उंचीच्या होतील. माऊंट एव्हरेस्टची उंची ८८४८ मीटर आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google