Home » ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य » चक्रीवादळ उद्या तामिळनाडूला धडकणार

चक्रीवादळ उद्या तामिळनाडूला धडकणार

=मुसळधार पावसाचा वेधशाळेचा इशारा=
वृत्तसंस्था
चेन्नई, ३० नोव्हेंबर –
tamilnadu-cyclone-warningबंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून, ते शुक्रवारी तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टीला धडक देण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. या चक्रीवादळाला ‘नाडा’ असे नाव देण्यात आले असल्याची माहिती स्थानिक चक्रीवादळ इशारा केंद्राचे संचालक एस. बालचंद्रन यांनी दिली.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर ते आता अतिवायव्येकडे सरकत आहे. सध्या ते चेन्नईच्या नैऋत्येपासून ८३० किलोमीटर अंतरावर आहे. आगामी १२ तासात त्याची गती आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ते तामिळनाडूच्या उत्तरेकडील किनारपट्टीला जोरदार धडक देण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 30 2016. Filed under ठळक बातम्या, तामिळनाडू, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google