Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » चिंता नको, पुरेशी रोख उपलब्ध

चिंता नको, पुरेशी रोख उपलब्ध

=आरबीआयचे आश्‍वासन=
वृत्तसंस्था
मुंबई, [१३ नोव्हेंबर] –
rbi-buldingदेशातील सर्वच बँकांमध्ये मुबलक प्रमाणात रोख रक्कम उपलब्ध आहे, अशी ग्वाही देताना, नागरिकांनी चिंता करण्याचे काहीच कारण नाही. केवळ घरात पैसा साठवून ठेवण्यासाठी वारंवार बँका आणि एटीएम्समध्ये जाऊ नका, असे आवाहन भारतीय रिझर्व्ह बँकेने रविवारी केले.
केवळ आरबीआयकडेच नाही, तर सर्वच बँकांच्या देशभरातील शाखांमध्ये ५० व १०० रुपयांच्या पुरेशा नोटा उपलब्ध आहेत. नव्या नोटा देखील आता जमा झालेल्या आहेत. त्यामुळे इतके घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे आरबीआयने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बँकांच्या शाखांमध्ये वारंवार जाऊन पैसे काढू नका. गरज असेल तेव्हाच काढा आणि आवश्यक तितकी रक्कम घरात ठेवा. उगाच अनावश्यक साठा करून ठेवू नका, असेही आरबीआयने म्हटले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google