Home » क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या » चीनमधील कोर्टवर सिंधू सुपर विजेती

चीनमधील कोर्टवर सिंधू सुपर विजेती

वृत्तसंस्था
फुझो, २० नोव्हेंबर –
pv-sindhu-pti-1भारताची रियो ऑलिम्पिक रौप्यपदक पटकावणारी पी. व्ही. सिंधू हिने बॅडमिंटन जीवनातील चीनच्या भूमीत प्रथमच सुपर सिरीज जिंकण्याचा इतिहास घडविला आहे.
आज येथे झालेल्या चायना खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान चीनच्या सून यूचा २-१ गेम्सने पराभव केला व महिला एकेरीतील विजेतेपद पटकावले. सात लाख डॉलर्स पुरस्कारांची ही स्पर्धा होती.
संपूर्ण देशाचेच नव्हे तर विश्‍वाचे लक्ष असलेल्या चायना खुल्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम लढतीत पहिला गेम सिंधूने २१-११ गुणांनी जिंकला व १-० अशी आघाडी घेतली होती. दुसरा गेम मात्र तिला १७-२१ ने गमवावा लागताच लढत १-१ ने बरोबरीत आली.
शेवटी तिसर्‍या व निर्णायक गेममध्ये सिंधूने झकास नेट प्लेसिंग व उंच शटल मारून चीनच्या सूनला संपूर्ण कोर्टवर सतत खेळवत ठेवले. याचा फायदा सिंधूला मिळाला.
निर्णायक गेम तिने २१-११ गुणांनी जिंकला व सोबतच सुपर सिरीजमधील पहिलेे विजेतेपद पटकावले. निर्णायक गेम जिंकताच सिंधूचा आनंद गगनात मावत नव्हता. तिने दर्शकांच्या अभिनंदनाचा स्वीकारही केला.
आज सिंधूने मारलेले काही शॉटस अप्रतिम ठरले. फोरहॅण्ड आणि बॅक हॅण्डचाही तिने पुरेपूर उपयोग केला. प्रतिस्पर्धीचे शटल्स परतविण्यातही ती वरचढ ठरली. आजचा दिवस सिंधूचाच होता असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये.
याअगोदर भारताच्या सायना नेहवालने २०१४ मध्ये याच स्पर्धेतील विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर ही स्पर्धा जिंकणारी सिंधू ही भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. गत वर्षी डेन्मार्क सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत सिंधूने धडक दिली होती. त्यावेळी अंतिम सामन्यात ऑलिम्पिक विजेती चीनच्या ली झुरेईकडून ती पराभूत झाली होती.

पंतप्रधानांकडून अभिनंदन
narendramodi-pmपंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज चायना खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत घवावीत यश मिळविलेल्या पी. व्ही. सिंधूचें अभिनंदन केले आहे. प्रथमच सुपर सिरीज पटकावल्याबद्दल आपले अभिनंदन या शब्दात पंतप्रधानांनी तिचे कौतुक केले आहे.

शेअर करा

Posted by on Nov 21 2016. Filed under क्रीडा, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google