Home » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जनधन खात्यात २१ हजार कोटी जमा

जनधन खात्यात २१ हजार कोटी जमा

=बंगालमधून सर्वाधिक रक्कम=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
jan-dhan-yojanaपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला रात्री  ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनेतर्ंगत २१ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या बंगालमधून सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक असल्याचे आज बुधवारी सूत्रांनी येथे सांगितले.
सरकारच्या नोटबंदी निर्णयानंतर विरोधी पक्षाकडून संसद व रस्त्यांवर सरकारचा निषेध करण्यात येत आहे. बुधवारी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी जंतर-मंतरवर आंदोलनही केले होते. या पृष्ठभूमीवर, पश्‍चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यातून जनधन खात्यात मोठी रक्कम जमा झाल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
असंघटित क्षेत्रात कार्यरत लोकांना बँक व्यवहारांची सवय व्हावी, या उद्देशाने सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना लागू केली होती. सरकारने जनधन खात्यात जमा होणार्‍या रकमेवरही लक्ष ठेवले असून ज्या खात्यात जादा रक्कम गोळा होत आहे, त्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठविण्यात येत आहेत.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google