Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » जपानमध्ये पुन्हा भूकंप

जपानमध्ये पुन्हा भूकंप

वृत्तसंस्था
टोकियो, २४ नोव्हेंबर
japan-mapजपानमधील फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पाजवळ गुरुवारी पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी नोंदली गेली. सोमवारीच या भागात ७.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.
गुरुवारच्या भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा प्रशासनाने दिलेला नाही. स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ६.३० वाजता हा भूकंप झाला. त्यानंतरच्या दीड तासात ३.२ ते ४.६ अशा तीव्रतेचे एकूण पाच धक्केही बसले. आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू फुकुशिमापासून २१० किलोमीटर अंतरावर होता.
सोमवारी आलेल्या मोठ्या भूकंपामुळे एक मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. या लाटांमुळे फुकुशिमा अणुउर्जा प्रकल्पाला कोणताही धक्का बसलेला नाही. याच भागात २०११ मध्ये झालेल्या भूकंपामुळे आणि त्यानंतर आलेल्या त्सुनामीमुळे १८ हजार जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, फुकुशिमाच्या अणुउर्जा प्रकल्पातील कूलिंग सिस्टिमही बंद पडल्यामुळे किरणोत्सर्गही झाला होता. २०११ मधील विध्वंसक भूकंपानंतर फुकुशिमामधील संरक्षक यंत्रणा अद्ययावत करण्यात आली होती. त्यामुळे उंच लाटा उसळल्या असल्या, तरीही अणुउर्जा प्रकल्पाचे नुकसान झालेले नाही.

शेअर करा

Posted by on Nov 25 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google