Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या » जर्मन वकिलातीवर तालिबानचा आत्मघाती हल्ला

जर्मन वकिलातीवर तालिबानचा आत्मघाती हल्ला

⇒ट्रकबॉम्बचा वापर
⇒सात ठार, १००वर जखमी,
afghan-security-officials-inspect-the-scene-of-multiple-suicide-bombing-that-targeted-the-german-consulate-in-afganistanमझार-ऐ-शरीफ (अफगाणिस्तान), [११ नोव्हेंबर] – अफगाणिस्तानमधील जर्मन वकिलातीवर तालिबानी आत्मघाती हल्लेखोराने केलेल्या स्फोटात सहा नागरिक ठार तर १००वर नागरिक जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानमधील मझार-ऐ-शरीफ या शहरातील जर्मन वकिलातीवर गुरुवारी रात्री ११च्या सुमारास तालिबानने हा हल्ला केला.
दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या दोन ट्रकच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला. या स्फोटात वकिलातीची मोठी हानी झाली. तालिबान या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मृतांपैकी दोन स्थानिक नागरिक आहेत तर अन्य दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. या हल्ल्यामुळे रस्त्यावर मोठा खड्‌डा निर्माण झाला असून रस्त्यावरील अनेक वाहने उलटलीत. दरम्यान, या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
मागील आठवड्यात नाटो सैन्याने अफगाणमधील दुर्गम भागात हवाई हल्ले केले होते. यामध्ये ३२ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला केल्याचे तालिबानने म्हटले आहे. जर्मन वकिलातीच्या आतमध्ये ट्रक घुसवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. मात्र तेथे कडक सुरक्षा असल्यामुळे त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळे दहशतवाद्यांनी वकिलातीबाहेरील भिंतीवर स्फोटकांनी भरलेला ट्रक आदळवला.

शेअर करा

Posted by on Nov 12 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google