Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जवानांमुळे देशवासियांची दिवाळी धुमधडाक्यात: पंतप्रधान

जवानांमुळे देशवासियांची दिवाळी धुमधडाक्यात: पंतप्रधान

=ही दिवाळी जवानांना समर्पित करा=
mann-ki-baat-modiनवी दिल्ली, ३० ऑक्टोबर, (हिं.स.) : देशातील विविध सुरक्षा यंत्रणांमध्ये कार्यरत असलेल्या जवानांमुळेच देशातील जनतेची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ‘मन की बात’च्या आजच्या २५ व्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दिवाळी हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव असून हा उत्सव आता फक्त भारतातच नव्हे तर जगभरात साजरा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. दिवाळीच्या आधी घराघरात स्वच्छता अभियान राबवले जाते, तसे ते घराबाहेरही राबवले जावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या उत्सव साजर्‍या करण्याच्या परंपरेला विज्ञानाची जोड आहे. प्रकाशाकडे नेणा-या उत्सवातून प्रेरणा मिळते. म्हणूनच आता जगभरात हा उत्सव साजरा केला जात आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, सिंगापूरमधील दिवाळी साजरी केल्याचेही त्यांनी सांगितले.
देशात असलेल्या गरिबीचा, अंधश्रद्धेचा, निरक्षरतेचा अंधार या दीपोत्सवानिमित्ताने दूर करण्याचा संकल्प देशवासियांनी करण्याचे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण देश जवानांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उघड्यावर शौच करण्यापासून मुक्तता मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सिक्कीम, हिमाचल प्रदेश राज्यात उघड्यावर शौच करणे बंद झाले आहे. अन्य राज्यातील जनतेला यापासून लवकरच मुक्ती मिळेल, असे ते म्हणाले. ३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली.

शेअर करा

Posted by on Oct 31 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google