Home » अर्थभारत, ठळक बातम्या » जिओ : मार्च २०१७ पर्यंत मोफत ४जी इंटरनेट सेवा

जिओ : मार्च २०१७ पर्यंत मोफत ४जी इंटरनेट सेवा

•मुकेश अंबानी यांची घोषणा
•नव्या-जुन्या ग्राहकांना लाभ
•नोटबंदीसाठी पंतप्रधानांना पाठिंबा,
वृत्तसंस्था
मुंबई, १ डिसेंबर –
jio-mukesh-ambaniजिओच्या नव्या आणि जुन्या यूजर्संना मार्च २०१७ पर्यंत मोफत ४ जी इंटरनेट सेवा देण्यात येईल, अशी घोषणा रिलायन्स जिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मुकेश अंबानी यांनी केली आहे. आज गुरुवारी पत्रपरिषदेत हा निर्णय मुकेश अंबानी यांनी जाहीर केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतानाच, नोटबंदीचेही त्यांनी समर्थन केले.
मुकेश अंबानी म्हणाले, ग्राहकांनी दाखवलेल्या विश्‍वासामुळेच जिओने हे शिखर गाठले आहे. कंपनीच्या ग्राहकांची संख्या पाच कोटींच्या घरात गेली आहे. जिओचे डाटा नेटवर्क उत्कृष्ट असून आम्हाला उत्तम प्रतिसाद लाभला आहे. दररोज ६ लाख यूजर्स जिओसोबत जोडले जात आहेत.
जिओचे सीम अवघ्या काही मिनिटातच सुरू होते. यासाठी आपण केंद्र सरकार आणि ‘ट्राय’ यांचे आभारी आहोत. एकीकडे सरकारला धन्यवाद देतानाच अंबानींनी इतर कंपन्यांबाबत नाराजी व्यक्त केली. या कंपन्यांनी जिओला सहकार्य केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. कॉल ड्रॉप होण्यासाठी या कंपन्या कारणीभूत ठरल्या, असे ते म्हणाले. आता जिओचा कॉल ड्रॉप रेट ९० टक्क्यांवरून २०  टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, असे त्यांनी सांगितले. १ सप्टेंबर २०१६ रोजी जिओची ४जी सेवा प्रारंभ करण्यात आली होती. तीन  महिन्यातच ५ कोटींपेक्षा जास्त ग्राहक झालेत, हे येथे उल्लेखनीय.

अशी आहे ऑफर!
ग्राहकांना सीम कार्डसाठी रांगेत उभे राहाण्याची गरज नसल्याचे मुकेश अंबानी यांनी आज गुरुवारी पत्रपरिषदेत सांगितले. ३१ डिसेंबरपर्यंत जिओ सीम घरपोच दिले जाईल, असे ते म्हणाले. मोफत इंटरनेट सेवा प्रदान करण्याच्या ऑफ़रचे नाव ‘जिओ हॅप्पी न्यू इयर’ असे आहे. याअंतर्गत जिओच्या नव्या ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत अमर्यादित व्हॉइस सेवा, व्हिडिओ कॉलिंग, एसएमएस मोफत उपलब्ध होणार आहे. इंटरनेटचा स्पीडही वाढवण्यावर जोर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतर कंपन्यांच्या ग्राहकांनाही त्यांचा क्रमांक न बदलता, जिओत ‘पोर्ट’ करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहितीही अंबानी यांनी यावेळी दिली.

शेअर करा

Posted by on Dec 2 2016. Filed under अर्थभारत, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google