Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » जीएसटीमुळे रोजगाराला चालना मिळणार: मोदी

जीएसटीमुळे रोजगाराला चालना मिळणार: मोदी

=जागतिक लवाद परिषदेचा समारोप=
narendra-modi-513नवी दिल्ली, [२३ ऑक्टोबर] – वस्तू व सेवा कर कायद्यामुळे देशांतर्गत मागणी आणि व्यापारात वाढ होईल. यामुळे रोजगाराला मोठी चालना मिळेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
‘नीती’ आयोगातर्फे आयोजित जागतिक लवाद परिषदेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, जीएसटीमुळे देशांतर्गत व्यापार आणि रोजगार यांच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील. आतापर्यंत देशांतर्गत बाजारपेठ ही विभाजित अवस्थेत होती. विविध राज्यांमधील वेगवेगळ्या करांमुळे वस्तू आणि सेवा यांच्यासाठी जादा किंमत मोजावी लागत होती. परिणामी आंतर-राज्यीय व्यापारावर याचा विपरित झाला.
राष्ट्रीय बाजारपेठेस एकात्मिक स्वरूप प्राप्त व्हावे, यासाठी आम्ही जीएसटी कायदा आणीत आहोत. आज घडीस भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वृद्धींगत होत आहे.
थेट विदेशी गुंतवणुकीसाठी भारत आणि भारतीय अर्थव्यवस्था आकर्षणाचे केंद्र झालेले आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेचे स्थान चमकत्या तार्‍याप्रमाणे झालेले आहे. कंपन्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास रोजगार निर्माण होईल आणि आर्थिक विकासाला शाश्‍वत स्वरूप प्राप्त होईल. हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा लोकशाही आणि बाजारपेठेतील मागणी बळकट करण्यावर आम्ही भर देऊ.

रोजगार शोधणारे आता रोजगार प्रदानकर्ते
भारत सध्या डिजिटल क्रांती अनुभवतो आहे. समाजातील डिजिटल आणि आर्थिक विभाजन यांना सांधण्याचे कार्य डिजिटल क्रांतीद्वारे होत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळून एकूणच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. डिजिटल विश्‍वाने विधि व्यवसायासाठी नवे दालनच उघडून दिले आहे. ‘कॉज लिस्ट’पासून तर कायद्यांची माहिती मोबाईलच्या एका ‘क्लिक’च्या अंतरावर आलेली आहे. व्यापाराची नाविन्यपूर्ण मॉडेल्स आणि ‘ऍप’ आधारित स्टार्ट अप यांनी भारतीयांमध्ये उद्यमशीलता रूजवली आहे. कालपर्यंत रोजगार शोधणारी मंडळी आता रोेजगार प्रदानकर्ती झाली आहेत.

शेअर करा

Posted by on Oct 24 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google