Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » जुन्या नोटा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा

जुन्या नोटा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करा

=अर्थमंत्रालयाची परवानगी=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २३ नोव्हेंबर –
finance-ministryचलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० व एक हजाराच्या जुन्या नोटा पोस्ट ऑफिसमधील बचत खात्यात जमा करता येणार आहे. याबाबतची परवानगी केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज दिली.
या जुन्या नोटा अल्प बचत योजनेत जमा करता येणार नाही, असे मंत्रालयाने मंगळवारी स्पष्ट केले होते. तथापि, पोस्ट ऑफिसमधील बचत खात्याला या आदेशातून आज वगळण्यात आले. यामुळे नागरिकांना आता आपल्याजवळील जुन्या नोटा जमा करणे शक्य होणार आहे.
दरम्यान, पोस्ट ऑफिस बचत खाते आता कोणत्याही व्यक्तीला केवळ २० रुपये जमा करून उघडता येणार असून, या खात्यातील जमा रकमेवर चार टक्के वार्षिक व्याज देण्यात येणार आहे. जे नागरिक खाते उघडल्यानंतर धनादेश पुस्तिका मागणार नाही, त्यांना आपल्या खात्यात कायमस्वरूपी किमान ५० रुपये ठेवावे लागणार आहे. तसेच किमान ५०० रुपये जमा करून जी व्यक्ती आपले बचत खाते उघडेल, त्याला धनादेश सुविधा उपलब्ध होणार असून, त्यासाठी त्याने आपल्या खात्यात कायमस्वरूपी ५०० रुपये ठेवणे अनिवार्य असणार आहे.

शेअर करा

Posted by on Nov 24 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google