Home » कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय » जैवविविधता संवर्धन कायद्याचा कृषीला फटका नको

जैवविविधता संवर्धन कायद्याचा कृषीला फटका नको

=पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन=
narendra-modi-16नवी दिल्ली, [६ नोव्हेंंबर] – कृषी-जैवविविधता संवर्धन कायद्याचा भारतासारख्या विकसनशील देशांच्या कृषी क्षेत्राच्या विकासावर कोणताही प्रतिकूल परिणाम व्हायला नको. कृषीचे उत्पन्न वाढविणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर योग्यच आहे, पण त्यासाठी कृषीचा विकास पणाला लावला जाऊ नये, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी येथे केले.
पहिल्याच आंतरराष्ट्रीय कृषी-जैवविविधता परिषदेला संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींना धोका वाढत आहे, असा स्पष्ट इशारा देताना, केंद्रीत संशोधन व आनुवांशिक संसाधनांच्या योग्य व्यवस्थापनातून त्यांचे संवर्धन करण्याच्या आवश्यकतेवर पंतप्रधानांनी भर दिला. ६० देशांमधील सुमारे ९०० प्रतिनिधी या परिषदेत उपस्थित झाले आहेत.
जगभरात कोटवधी लोक भूक, कुपोषण आणि दारिद्र्याचा सामना करीत आहेत. या गंभीर समस्या हाताळण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला मोठी भूमिका पार पाडावी लागणार आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढताना कृषीचा निरंतर विकास आणि जैवविविधतेचे संवर्धन याकडेही आपण दुर्लक्ष करायला नको.
कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या वापराचा नकारात्मक परिणाम होत आहे काय, याचा आढावा देखील आपण घ्यायला हवा, असे सांगताना त्यांनी कीटकनाशकांचा जास्त प्रमाणात वापर झाल्याने मधमाशांमुळे होणार्‍या परागीकरणावरील विपरित परिणामांचे उदाहरण दिले.
यावेळी मोदी हसतच असेही म्हणाले की, तंत्रज्ञानाचा आपल्या नागरिकांवरही नकारात्मक परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. कारण, मोबाईल क्रांतीनंतर लोक स्वत:च्याच घरातील दूरध्वनीचे क्रमांकही विसरले आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करताना आपण सावध राहायलाच हवे.

शेअर करा

Posted by on Nov 7 2016. Filed under कृषी, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google