Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे निधन

प्रतिनिधी
पुणे, २७ नोव्हेंबर –
anand-yadavज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे रविवार दि. २७ रोजी पुण्यात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. पुण्यातल्या धनकवडीतील कलानगरमधल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. सोमवार दि. २८ सकाळी ११ ते १२ वाजता मेहता हाऊसमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे त्यांचा जन्म झाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. झोंबी, नागरानी, घरभिंती, काचवेल, नटरंग या गाजलेल्या कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले. तसेच झोंबी या कथेसाठी १९९० चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. ग्रामीण साहित्यिक ही त्यांची खरी ओळख होती.  ‘झोंबी’कार म्हणून आनंद यादव प्रसिद्ध आहेत.
ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. आनंद यादव यांनी संत तुकारामाच्या जीवनावर लिहिलेल्या ‘संतसूर्य तुकाराम’ या काल्पनिक कादंबरीवर आक्षेप घेत वारकऱ्यांनी हल्लाबोळ करून त्यांना २००९ सालच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारण्यापासून वंचित केले. कादंबरीतून तथाकथित आक्षेपार्ह मजकूर काढून टाकल्यानंतर देखील वारकऱ्यांचे समाधान झाले नाही. अखेर कादंबरी बाजारातून काढून घ्यावी लागली. संतसूर्य तुकाराम व लोकसखा ज्ञानेश्वर या पुस्तकांमुळे महाबळेश्वर योथील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवता आले नाही. त्यांच्या  कादंबरीवर नटरंग हा चित्रपट प्रसिध्द झाला आहे.
आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
आनंद यादव यांची ग्रंथसंपदा:
कथासंग्रह
खळाळ १९६७
घरजावई १९७४
माळावरची मैना १९७६
आदिताल १९८०
डवरणी (पुस्तक) १९८२
उखडलेली झाडे १९८६
व्यक्तिचित्रे
मातीखालची माती (१९६५)
ललित, वैचारिक लेख संग्रह/समीक्षा ग्रंथ
स्पर्शकमळे (१९७८)
पाणभवरे (१९८२)
१९६० नंतरची सामाजिक स्थिती आणि साहित्यातील नवे प्रवाह
आत्मचरित्र मीमांसा
मराठी लघुनिबंधाचा इतिहास
ग्रामीणता : साहित्य आणि वास्तव
ग्रामीण साहित्य : स्वरूप व समस्या
मराठी साहित्य : समाज आणि संस्कृती
कादंबरी
गोतावळा १९७१
नटरंग (पुस्तक) १९८०
एकलकोंडा १९८०
माऊली १९८५
संतसूर्य तुकाराम
आत्मचरित्रात्मक
झोंबी १९८७.
नांगरणी १९९०
घरभिंती १९९२
काचवेल
काव्यसंग्रह
हिरवे जग १९६०
मळ्याची माती १९७८
मायलेकरं (दी‍र्घकविता) १९८१
बालकथा
उगवती मने

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google