Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » झाकिरची आर्थिक नाकेबंदी

झाकिरची आर्थिक नाकेबंदी

=इस्लामिक फाऊंडेशनचा विदेशी निधीही बंद=
zakir-naikनवी दिल्ली, [१ नोव्हेंबर] – आपल्या प्रक्षोभक भाषणांनी मुस्लिम तरुणांच्या मनात दहशतवादाचे बीज पेरणारा वादग्रस्त धर्मगुरू झाकिर नाईकची आर्थिक कोंडी करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला विदेशातून मिळणार्‍या निधीवरही लवकरच बंदी घालण्यात येणार आहे.
झाकिरच्या या स्वयंसेवी संस्थेला केंद्रीय गृहमंत्रालय शेवटची कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे आणि त्यानंतर लगेच या संस्थेची विदेशी विनिमय नियमन कायद्यांतर्गतची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याशिवाय, झाकिरच्या आयआरएफ एज्युकेशन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचीही विदेशातून देणगी मिळविण्याचे मार्ग बंद करण्यासाठी गृहमंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. यासाठी या संस्थेला पूर्व परवानरी श्रेणीत टाकण्यात येणार असून, त्यानंतर सरकारच्या परवानगीशिवाय संस्थेला विदेशातून एक पैसाही स्वीकारता येणार नाही, अशी माहिती अच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
या संस्थांना देश-विदेशातून मिळणार्‍या निधीचा वापर झाकिर तरुणांच्या मनात दहशतवादाचे विष पेरण्यासाठी आणि त्यांना इसिससारख्या जहाल दहशतवादी संघटनांमध्ये जाण्यास प्रवृत्त करण्यासाठी करीत असल्याचे विविध तपास संस्थांच्या चौकशीतून स्पष्ट झाल्यानंतर हे कठोर पाऊल उचलण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, विविध तपास संस्था झाकिरच्या देशविरोधी कारवायांचा तपास करीत असताना आणि बांगलादेशच्या ढाका शहरात झालेल्या बॉम्बस्फोटातील अतिरेक्यांनी झाकिर हाच आमचा प्रेरणास्रोत असल्याची कबुली दिली असताना, त्याच्या इस्लामिक फाऊंडेशनच्या विदेशी विनिमय नियमन कायद्यातील नोंदणी परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. या प्रकरणी गृहमंत्रालयातील संयुक्त सचिवासह चार अधिकार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते.

शेअर करा

Posted by on Nov 2 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google