Home » अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » टपाल कार्यालयांमध्ये ३२ हजार ६३१ कोटी जमा!

टपाल कार्यालयांमध्ये ३२ हजार ६३१ कोटी जमा!

=नोटबंदी निर्णयाचा परिणाम=
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, २७ नोव्हेंबर –
india_post_logo५०० व एक हजाराच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर अवघ्या १४ दिवसांत नागरिकांनी देशभरातील सुमारे १.५५ लाख टपाल खात्यांमध्ये ३२ हजार ६३१ कोटी रुपये जमा केले आहेत.
टपाल कार्यालयांनी देखील १० ते २४ नोव्हेंबर या काळात जुन्या नोटा बदलून देताना ३६८० कोटी रुपयांचे नवीन चलन नागरिकांना दिले आहे. टपाल खात्याचे सचिव बी. व्ही. सुधाकर यांनी याबाबतची माहिती वृत्तसंस्थेला दिली.
१० ते २४ नोव्हेंबर या काळात आमच्या देशभरातील शाखांमधून ३६८० कोटी रुपये मूल्य असलेल्या ५७८ लाखांच्या नव्या नोटा बदलवून देण्यात आल्या. जुन्या नोटा जमा करण्याचे प्रमाण लक्षात घेतले, तर ५०० आणि एक हजारांच्या ४३.४८ कोटी नोटा आमच्या विविध कार्यालयांमध्ये जमा करण्यात आल्या असून, त्यांची एकूण किंमत ३२,६३१ कोटी रुपये इतकी आहे, असे त्यांनी सांगितले.
आमच्या १.५५ लाख कार्यालयांपैकी सुमारे १.३० लाख कार्यालये ग्रामीण भागात आणि उर्वरित २५ हजार कार्यालये शहर व तालुका स्तरावर आहेत. या सर्वच कार्यालयांनी नोटबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा स्वीकारण्यात व नवीन चलन वितरित करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, असेही सुधाकर यांनी सांगितले.

शेअर करा

Posted by on Nov 28 2016. Filed under अर्थ, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google