Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या » ट्रम्प मंत्रिमंडळात बॉबी जिंदल?

ट्रम्प मंत्रिमंडळात बॉबी जिंदल?

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, [१३ नोव्हेंबर] –
bobby-jindalअमेरिकेतील लुसियाना प्रांताचे दोन वेळा गव्हर्नर राहिलेले आणि या पदावर निवडून आलेले पहिले अनिवासी भारतीय बॉबी जिंदल यांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक प्रसार माध्यमांनी रविवारी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. ४५ वर्षीय बॉबी जिंदल यांचा ट्रम्प सरकारमध्ये समावेश झाल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कॅबिनेटमध्ये प्रवेश करणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे नागरिक ठरणार आहेत.
वॉल स्ट्रिट जर्नलमधील वृत्तानुसार, बॉबी जिंदल यांची देशाचे नवे आरोग्य मंत्री म्हणून नियुक्ती करण्यावर ट्रम्प गंभीरपणे विचार करीत आहेत. त्यांच्यासोबत बेन कार्सन यांचीही याच मंत्रालयात नियुक्ती होण्याची शक्यता आहे. अलीकडेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांच्या कॅबिनेटचे स्वरूप कसे असावे आणि त्यात कोणाकोणाचा समावेश व्हावा, याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहे. काही संभाव्य उमेदवारांची यादीही तयार झाली असून, यात बॉबी जिंदल यांचे नाव असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, बेन कार्सन आणि बॉबी जिंदल हे दोघेही रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्राध्यक्षपदाचे माजी उमेदवार राहिले आहेत. पण, ट्रम्प यांच्याकरिता त्यांनी माघार घेतली होती. दरम्यान, ट्रम्प मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या शक्यतेवर बॉबी जिंदल यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

शेअर करा

Posted by on Nov 14 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, छायादालन, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

प्रतिक्रिया नोंदवा

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)

हवामान

  • दृष्टीक्षेपात

      व्हिडीओ संग्रह

      मागील बातम्या, लेख शोध

      Search by Date
      Search by Category
      Search with Google